AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND Toss : ऑस्ट्रेलियाच्या बाजूने सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल, टीम इंडिया विरुद्ध बॉलिंग, Playing 11 मध्ये 2 बदल

India vs Australa 2nd Odi Toss Result and Playing 11: टीम इंडियासाठी 'करो या मरो' सामन्यात ऑस्ट्रेलिया टॉसचा बॉस ठरला आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

AUS vs IND Toss : ऑस्ट्रेलियाच्या बाजूने सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल, टीम इंडिया विरुद्ध बॉलिंग, Playing 11 मध्ये 2 बदल
India vs Australa 2nd Odi Toss ResultImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Oct 23, 2025 | 9:55 AM
Share

टीम इंडियाचा नवनियुक्त एकदिवसीय कर्णधार शुबमन गिल पुन्हा एकदा कमनशिबी ठरला आहे. शुबमनच्या विरोधात ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला आहे. उभयसंघातील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे एडलेड ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पर्थनंतर एडलेडमध्येही ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. कॅप्टन मिचेल मार्श याने टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियाकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल

ऑस्ट्रेलियाने विजयी सुरुवातीनंतरही दुसर्‍या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये तब्बल 3 बदल केले आहेत. जोश फिलिप, नॅथन एलिस आणि मॅथ्यू कुहनेमन या तिघांच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एलेक्स कॅरी, झेव्हियर बार्टलेट आणि एडम झॅम्पा या तिघांचा समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडिया अनचेंज

टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यनासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात होतं. मात्र कॅप्टन शुबमन गिल याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. शुबमनने आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.

टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ सामना

दरम्यान टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं. सलामीच्या सामन्यातील पहिल्या डावात एकूण 5 वेळा पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे हा सामना 26 ओव्हरचा करण्यात आला. दुसऱ्या डावात पाऊस गायबच झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मदत झाली. ऑस्ट्रेलियाने 21.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून डीएरआएसनुसार 131 धावांचं आव्हान पूर्ण करत मालिकेत विजयी सलामी दिली. त्यामुळे आता टीम इंडिया एडलेडमध्ये विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्यासह पहिल्या पराभवाची परतफेड करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल

भारतीय संघाचे 11 शिलेदार : रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण? : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अ‍ॅलेक्स केरी (विकेटकीपर), कूपर कॉनोली, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, मिचेल ओवेन, अ‍ॅडम झॅम्पा आणि जोश हेझलवुड.

मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.