AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 4th T20I: कॅप्टन सूर्या चौथ्या सामन्यातून उपकर्णधार शुबमन गिलचा पत्ता कापणार?

Australia vs India 4th T20i : टीम इंडिया चौथ्या टी 20i सामन्यात मालिकेत 2-1 ने आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यातून टीम मॅनेजमेंट गेल्या काही डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरणाऱ्या शुबमन गिल याला बाहेर करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

IND vs AUS 4th T20I: कॅप्टन सूर्या चौथ्या सामन्यातून उपकर्णधार शुबमन गिलचा पत्ता कापणार?
Shubman Gill Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Nov 05, 2025 | 11:45 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी 20i सामना हा गुरुवारी 6 नोव्हेंबरला होणार आहे. उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे मालिका विजयाच्या हिशोबाने चौथा सामना निर्णायक असा आहे. हा सामना क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल येथे होणार आहे. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केल्यानंतर टीम इंडियाने विजयाचं खातं उघडलं. आता चौथ्या सामन्यातून टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल याला वगळण्याची चर्चा सुरु झाली आहे.

कोणत्याही सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये कर्णधार आणि उपकर्णधाराची जागा निश्चित असते. मात्र शुबमन गिल याने या मालिकेत काही खास केलं नाही. शुबमनला पहिल्या 3 सामन्यांमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे शुबमनला चौथ्या सामन्यातून बाहेर करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सलामी फलंदाजांवर संघाला वेगवान आणि तडाखेदार सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असते. अभिषेक शर्मा भारतासाठी सातत्याने धावा करत आहे. मात्र शुबमनला धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. शुबमनने मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये एकूण 57 धावा केल्या आहेत. तसेच शुबमनला आशिया कप 2025 स्पर्धेपासून आतापर्यंत सलग 10 टी 20i सामन्यांमध्ये एकदाही अर्धशतकही करता आलेलं नाही. शुबमनसाठी ही कामगिरी वैयक्तिकरित्या आणि संघासाठीही चिंताजनक आहे.

गिलसाठी संजूच्या जागेत बदल

टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने शुबमनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये घेण्यासाठी संजू सॅमसन याच्या ओपनिंज पोजिशनमध्ये बदल केला. संजू सॅमसन शुबमनआधी ओपनिंग करायचा. मात्र शुबमनच्या कमबॅकनंतर संजूला ओपनिंगऐवजी त्या खालील स्थानी खेळवलं. संजूने गेल्या काही मालिकेत ओपनिंगला खोऱ्याने धावा केल्यात. मात्र त्यानंतरही कॅप्टन सूर्या आणि कोच गंभीर यांनी शुबमनसाठी संजूच्या जागेत बदल केला. मात्र त्या बदलाचा आतापर्यंत तरी काही खास फरक पडलेला दिसत नाही.

संजूची मिडल ऑर्डरमधील आकडेवारी काही खास नाही. मात्र त्यानंतरही संजूला मिडल ऑर्डरमध्ये टाकण्यात आलं. त्यात संजू सॅमसन याला तिसर्‍या सामन्यातून वगळण्यात आलं. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट शुबमनला वगळण्याचा निर्णय घेणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल/संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंह.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.