AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : रोहितची ऐतिहासिक कामगिरी, Adelaide मध्ये ‘दादा’गिरी संपवली, मोठा रेकॉर्ड ब्रेक

Rohit Sharma Broke Sourav Ganguly Record : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने माजी निवृत्त कर्णधार सौरव गांगुली याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रोहित यासह टीम इंडियासाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

AUS vs IND : रोहितची ऐतिहासिक कामगिरी, Adelaide मध्ये 'दादा'गिरी संपवली, मोठा रेकॉर्ड ब्रेक
Rohit Sharma AUS vs IND 2nd OdiImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Oct 23, 2025 | 1:17 PM
Share

टीम इंडियाच्या रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये काही खास करता आलं नाही.  रोहित पर्थमधील सामन्यात अवघ्या 8 धावांवर बाद झाला.  त्यामुळे हिटमॅनच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.  मात्र रोहितने एडलेडमध्ये चाहत्यांची निराशा केली नाही. रोहितने निर्णायक क्षणी श्रेयस अय्यर याच्यासह शतकी भागीदारी केली. रोहितने या भागीदारी दरम्यान एडलेडमध्ये दादागिरी संपवली. रोहितने टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा रेकॉर्ड ब्रेक करत इतिहास घडवला. रोहित यासह टॉप 3 मध्ये एन्ट्री घेतली.

रोहितने ‘दादा’गिरी संपवली

रोहितने सौरव गांगुली याचा एकदिवसीय क्रिकेटमधील धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहित गांगुलीला पछाडताच टीम इंडियासाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा एकूण तिसरा तर दुसरा सक्रीय फलंदाज ठरला. तर गांगुलीची चौथ्या स्थानी घसरण झाली.

रोहितची एकदिवसीय कारकीर्द

रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 275 सामन्यांमधील 267 डावांमध्ये 11 हजार 249 धावा आहेत. तर गांगुलीने 308 सामन्यांमधील 297 डावांत 11 हजार 221 धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली विराजमान आहे. विराट टीम इंडियासाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा सक्रीय फलंदाज आहे.

श्रेयससह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावल्यानंतर रोहितने श्रेयस अय्यर याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. शुबमन गिल 9 आणि विराट कोहली 0 वर आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 2 आऊट 17 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या मुंबईकर जोडीने टीम इंडियासाठी निर्णायक योगदान दिलं. या दोघांनी 118 धावांची भागीदारी केली. मात्र रोहित आऊट होताच ही जोडी फुटली.

सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारे भारतीय

रोहित शर्माची संयमी खेळी

रोहित शर्मा याला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने जोश हेझलवूड याच्या हाती कॅच आऊट केलं.रोहितने 97 बॉलमध्ये 75.26 च्या स्ट्राईक रेटने 73 रन्स केल्या. रोहितने या खेळीतील 73 पैकी 28 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. रोहितने या खेळीत 2 सिक्स आणि 4 फोर लगावले. रोहितकडून चाहत्यांना शतकाची अपेक्षा होती. रोहित त्याप्रमाणेच खेळतही होता. मात्र रोहित शतकापर्यंत पोहचू शकला नाही. मात्र रोहितने निर्णायक क्षणी श्रेयससह चिवट आणि झुंजार भागीदारी करत भारताला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.