AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : दुसऱ्या सामन्यानंतर टीममध्ये बदल, असा आहे सुधारित संघ, कोण IN कोण आऊट?

Australia vs India T20i Series 2025 : ऑस्ट्रेलियाने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये टीम इंडियावर 4 विके्टसने मात करत टी 20i मालिकेतील पहिला सामना जिंकला. मात्र त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यासाठी काही बदल केले आहेत. जाणून घ्या.

AUS vs IND : दुसऱ्या सामन्यानंतर टीममध्ये बदल, असा आहे सुधारित संघ, कोण IN कोण आऊट?
india vs australia t20i series 2025Image Credit source: Bcci
| Updated on: Oct 31, 2025 | 11:09 PM
Share

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिला टी 20I सामना पावसामुळे पूर्ण झाला नाही. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या टी 20I सामन्यात विजयी सलामी दिली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना हा 4 विकेट्सने जिंकला. भारताने विजयासाठी दिलेलं 126 धावांचं आव्हान कांगारुंनी 13.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह टीम इंडियाची मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमधील विजयी घोडदौड रोखली. टीम इंडियाने या मैदानात 17 वर्षांनंतर टी 20I सामना गमावला.

तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल

दुसरा सामना गमावल्यानंतर आता टीम इंडियासमोर तिसऱ्या टी 20I मध्ये विजय मिळवणं महत्त्वाचं झालं आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा रविवारी 2 नोव्हेंबरला होबार्टमध्ये होणार आहे. त्याआधी यजमान ऑस्ट्रेलिया संघात बदल झाला आहे. हे बदल होणार असल्याचं या मालिकेआधीच ठरलं होतं.

जोश हेझलवूड 2 सामन्यांचा पाहुणा

जोश हेझलवूड याला पहिल्या 2 सामन्यांसाठीच संधी देण्यात आली होती. त्यामुळे जोश उर्वरित मालिकेचा भाग नसले. जोशने दुसऱ्या सामन्यात 3 विकेट्स मिळवल्या. जोशनंतर आता उर्वरित 3 सामन्यांसाठी माहली बिअर्डमॅन ऑस्ट्रेलिया संघासह जोडला जाणार आहे. तसेच सीन एबॉट याला पहिल्या 3 सामन्यांसाठी संधी देण्यात आली आहे. तर बेन द्वारशुईस याला शेवटच्या 2 अर्थात चौथ्या आणि पाचव्या टी 20I साठी संधी देण्यात आली आहे.

तिसऱ्या टी 20I सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हीस हेड, सीन एबॉट, झेव्हीयर बार्टलेट, महली बियर्डमॅन, टीम डेव्हीड, नॅथन एलिस, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मॅथ्यू कुहनेमॅन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोयनिस, जोश फिलिप (विकेटकीपर) एडम झॅम्पा आणि मिचेल ओवेन.

टीम इंडिया 2024 पासून अजिंक्य, ऑस्ट्रेलिया रोखण्यात यशस्वी ठरणार?

दरम्यान टीम इंडियाचा 2024 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेपासून दबदबा कायम आहे. भारताने या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एकदाही टी 20i मालिका गमावलेली नाही. भारताने टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर एकूण 5 टी 20i मालिका खेळल्या आहेत. भारताने सर्व मालिका जिंकल्या आहेत. तसेच भारताने ऑस्ट्रेलियातही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे कॅप्टन सुर्यकुमार यादव याच्यासमोर ही विजयी घोडदौड कायम राखण्याचं आव्हान असणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...