Team India : आशिया कपनंतर टीम इंडियाला झटका;ऑलराउंडर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार!
India Tour of Australia 2025: टीम इंडियाच्या मॅचविनर ऑलराउंडरला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी 20i मालिकेला मुकावं लागण्याची शक्यता आहे. कोण आहे तो?

भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप 2025 ट्रॉफी जिंकली. टीम इंडिया फायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करत नवव्यांदा आशिया चॅम्पियन ठरली. आशिया कपनंतर आता टीम इंडिया ऑक्टोबर महिन्यात व्हाईट बॉल सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण 2 मालिकांमध्ये 8 सामने खेळणार आहे. उभयसंघात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाला तगडा झटका लागला आहे. टीम इंडियाच्या मॅचविनर आणि ऑलराउंडरला या मालिकेतून बाहेर व्हावं लागणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑलराउंडर हार्दिक पंड्या याला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दोन्ही मालिकांना मुकावं लागणार आहे. हार्दिक टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. हार्दिकने भारताला आतापर्यंत अनेकदा बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर विजयी केलं आहे. त्यामुळे हार्दिक महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र हार्दिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नसल्यास टीम इंडियाला त्याची उणीव भासणार हे नक्की आहे.
हार्दिकमागे दुखापतीचं ग्रहण
हार्दिकला दुखापतीमुळे आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्याला मुकाव लागलं होतं. त्यामुळे हार्दिकच्या जागी अंतिम सामन्यात रिंकु सिंह याचा समावेश करण्यात आला होता. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला अजून 3 आठवडे बाकी आहेत. मात्र हार्दिकला दुखापतीतून पूर्णपणे फिट होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळे हार्दिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उपलब्ध नसण्याची अधिक शक्यता आहे.
तसेच हार्दिक टी 20i मालिकेतील शेवटच्या काही सामन्यांपर्यंत फिट होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र हार्दिक खेळू शकणार की नाही? हे तपासणीनंतरच स्पष्ट होईल.
हार्दिकला आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दुखापत झाली होती. त्या सामन्यात रवी शास्त्री यांनी समालोचन करताना हार्दिकला त्रास जाणवत असल्याचं म्हटलं होतं.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 19 ऑक्टोबर, पर्थ
दुसरा सामना, 23 ऑक्टोबर, एडलेड
तिसरा सामना, 25 ऑक्टोबर, सिडनी,
टी 20i मालिका
पहिला सामना, 29 ऑक्टोबर, कॅनबेरा
दुसरा सामना, 31 ऑकटोबर, मेलबर्न
तिसरा सामना, 2 नोव्हेंबर, होबार्ट
चौथा सामना, 6 नोव्हेंबर गोल्ड कोस्ट
पाचवा सामना, 8 नोव्हेंबर, ब्रिस्बेन
