AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs WI : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पराभवाची सळ पॅट कमिन्सच्या मनात कायम, स्मिथचा उल्लेख करत म्हणाला…

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ नाही. तो नसल्याने पॅट कमिन्सने खंत व्यक्त केली तसेच एक टोमणाही मारला.

AUS vs WI : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पराभवाची सळ पॅट कमिन्सच्या मनात कायम, स्मिथचा उल्लेख करत म्हणाला...
पॅट कमिन्सImage Credit source: Getty
| Updated on: Jun 25, 2025 | 8:58 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज विरुद्ध खेळत आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. अशा स्थितीत ही मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान आहे. ही मालिका खिशात घातली तर विजयी टक्केवारी चांगली राहील. त्यामुळे या मालिकेत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया दिग्गज खेळाडूंची उणीव भासणार आहे. स्टीव्ह स्मिथ या मालिकेत नसल्याने प्लेइंग इलेव्हनचं चित्र बदललं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टीव्ह स्मिथच्या हाताला चेंडू लागला होता. दुखापतीमुळे तो थेट मैदानाबाहेर गेला. दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथ हेल्मेट घालून पहिल्या स्लिपजवळ उभा होता. त्यामुळे वेगाने येणाऱ्या चेंडूचा अंदाज घेणं कठीण होतं. टेम्बा बावुमाचा बॅटला चेंडू घासून थेट स्टीव्ह स्मिथच्या हातात गेला. पण चेंडू पकडताना हाताला गंभीर दुखापत झाली.

आयसीसीच्या मते स्टीव्ह स्मिथने आपल्या दुखापतीवर अपडेट देताना सांगितलं की, ‘माझ्या हाताला आठ आठवडे पट्टी बांधलेली असेल. त्यानंतर मी दोन आठवड्यांनी पुन्हा खेळायला सुरुवात करू शकतो. पुन्हा खेळणे हे माझे बोट योग्यरित्या काम करू शकते की नाही यावर अवलंबून असेल.’ असं असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने त्याची उणीव बोलून दाखवली. मात्र शेवटी त्याने जाणीवपूर्वक झेलचा उल्लेख केल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. तसं पाहीलं तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याच्या झेलबाबत वक्तव्य करण्याची गरज नव्हती. त्या झेलमुळे सामना हातून निसटल्याची भावना त्याच्या मनात असावी असं क्रीडाप्रेमी म्हणत आहे.

‘परदेशात मालिका नेहमीच कठीण असते. जवळजवळ काही आठवड्यांपूर्वीसारखीच. स्मिथची उणीव भासेल. त्याचे झेलही.’, असं पॅट कमिन्सने नाणेफेकीवेळी सांगितलं होतं. या दोन वाक्यात बरंच काही होतं. एक तर काही आठवड्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमावला होता. या सामन्यात हा झेल महत्त्वाचा ठरला होता. हा झेल पकडला असता कदाचित सामन्याचं चित्र वेगळं असतं.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.