AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी धक्का, दिग्गज खेळाडू खेळणार की नाही? झालं असं की…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. एका पाठोपाठ एक धडाधड संघ जाहीर होत आहेत. असं असताना काही संघांची या स्पर्धेपूर्वी धाकधूक वाढली आहे. कारण या स्पर्धेपूर्वी खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी धक्का, दिग्गज खेळाडू खेळणार की नाही? झालं असं की...
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी धक्का, दिग्गज खेळाडू खेळणार की नाही? झालं असं की...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jan 19, 2026 | 5:57 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार असून जोरदार तयारी सुरु आहे. ही स्पर्धा श्रीलंका आणि भारतात होणार आहे. असं असताना काही संघांना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. यात भारतीय संघही मागे नाही. कारण भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूनाही दुखापत झाली आहे. तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला संघात दुखणही तसंच आहे. कारण मिचेल मार्शच्या नेतृत्वात उतरणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला सुरुवातीच्या काही सामन्यात धक्का बसणार आहे. कारण वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स या स्पर्धेत खेळणार की नाही? याबाबत साशंकता आहे. पॅट कमिन्सला पाठीच्या दुखापतीचा त्रास आहे. त्यामुळे त्याची निवड पाकिस्तान विरूद्धच्या टी20 मालिकेसाठी झाली नाही. तसेच वर्ल्डकपच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

ऑस्ट्रेलिया संघ टी20 मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी 19 जानेवारीला संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात पॅट कमिन्सला आराम दिला गेला आहे. पाठीच्या दुखापतीतून पॅट कमिन्स अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे त्याला आराम दिला गेला आहे. ऑस्ट्रेलियाने निवड समिती अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितलं की, वनडे आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुरुवातीच्या दोन सामन्यात खेळणार नाही. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात पॅट कमिन्स परतेल अशी आशा आहे. ऑस्ट्रेलियाचे साखळी फेरीचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहे. या गटात ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, ओमान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे संघ आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 11 फेब्रुवारीला आयर्लंडशी होईल. यानंतर 13 फेब्रुवारीला झिम्बाब्वेशी भिडणार आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कमकुवत आहेत. त्यामुळे पॅट कमिन्स या दोन सामन्यांना मुकला तरी फार काही फरक पडणार नाही. पण 16 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात परतेल अशी आशा आहे. पॅट कमिन्सची दुखापत तिथपर्यंत बरी होईल असं सांगण्यात येत आहे. एशेज कसोटी मालिकेतही पॅट कमिन्स फक्त एकच सामना खेळला होता. दुसरीकडे, पॅट कमिन्स जोडीदार आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडलाही दुखापतीने ग्रासलं आहे. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी फिट होण्याची शक्यता आहे. हेझलवूड एशेज कसोटी मालिकेत खेळला नव्हता.

महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?.