AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUSW vs INDW Womens T20 WC Score Updates and HIghlights : ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने विजय, उपांत्य फेरीत धडक, टीम इंडियाचं पॅकअप

| Updated on: Jun 29, 2026 | 12:24 AM
Share

Australia vs India Womens T20 World Cup 2026 Score Updates and Highlights In Marathi: ऑस्ट्रेलिाने टीम इंडियावर मात करत सलग पाचवा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने यासह उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. तर भारताचं आव्हान संपुष्टात आलं.

AUSW vs INDW Womens T20 WC Score Updates and HIghlights : ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने विजय, उपांत्य फेरीत धडक, टीम इंडियाचं पॅकअप
India vs Australia Womens T20i World Cup 2026Image Credit source: TV9

आयसीसी वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियासमोर आपल्या मोहिमेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान होतं. टीम इंडियाला उपांत्य फेरीत पोहचाण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकायचं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने 171 धावांचं आव्हान हे 19 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या सामन्याचं आयोजन हे लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं होतं.  भारताचं पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे भारतीय महिला संघाचं यंदाही टी 20i वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 28 Jun 2026 10:16 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने विजय, उपांत्य फेरीत धडक, टीम इंडियाचं पॅकअप

    ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 6 विकेट्सने मात करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने 171 धावांचं आव्हान हे 1 ओव्हरआधी 4 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा हा सलग पाचवा विजय ठरला. तर भारताचं पराभवासह पॅकअप झालं आहे.

  • 28 Jun 2026 10:05 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : ऑस्ट्रेलिया विजयाच्या दिशेने, टीम इंडिया कमबॅक करणार?

    ऑस्ट्रेलियाने विजायच्या दिशेने घोडदौड सुुरु केली आहे. ऑस्ट्रेलियाने 17 ओव्हरमध्ये 171 रन्सचा पाठलाग करताना  3 विकेट्स गमावून 154 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया इथून कमबॅक करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 28 Jun 2026 09:36 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : बेथ मुनी आऊट, दीप्ती शर्माकडून झुलन गोस्वामीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

    दीप्ती शर्मा हीने 10 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर बेथ मुनी हीला राधा यादव हीच्या हाती कॅच आऊट केलं. यासह दीप्ती शर्मा हीने इतिहास घडवला.  दीप्ती शर्मा हीने झुलन गोस्वामीचा  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक 355 विकेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

  • 28 Jun 2026 09:27 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : जोडी फुटली रे, फोबी लिचफिल्ड आऊट, ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी आणि फोबी लिचफिल्ड ही सेट जोडी फोडली आहे. श्री चरणी हीने सातव्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर फोबी लिचफिल्ड हीला स्मृती मंधाना हीच्या हाती कॅच आऊट केलं आहे. लिचफिल्ड हीने 25 बॉलमध्ये 24 रन्स केल्या.

  • 28 Jun 2026 09:19 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : मुनी-लिचफिल्ड जोडी जमली, टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात

    बेथ मुनी आणि फोबी लिचफिल्ड जोडी जमली आहे. या दोघींनी ऑस्ट्रेलियाला 6 ओव्हरमध्ये 1 आऊट 49 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. त्यामुळे टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात आहे.

  • 28 Jun 2026 08:55 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : ऑस्ट्रेलियाला दुसऱ्याच बॉलवर पहिला झटका, रेणूका सिंग ठाकुरकडून कडक सुरुवात

    रेणूका सिंह ठाकुर हीने भारताला जबराट सुरुवात मिळवून दिली आहे. रेणूकाने ऑस्ट्रेलियाला डावातील दुसऱ्याच बॉलवर पहिला झटका दिला आहे. रेणूकाने जॉर्जिया वॉल हीला 4 रन्सवर एलबीडब्ल्यू आऊट केलं.

  • 28 Jun 2026 08:39 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : टीम इंडियाच्या 170 धावा, ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखणार?

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 170 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 8.55 च्या रनरेटने 171 धावा कराव्या लागणार आहेत. आता भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाला 170 धावांआधी रोखणार का? हे पाहणँ महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 28 Jun 2026 08:32 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : जेमिमाह रॉडिग्स रिटायर्ड आऊट, ऋचा घोष मैदानात

    टीम इंडियाने जेमिमाह रॉड्रिगसच्या रुपात तिसरी विकेट गमावली आहे. जेमिमाह रॉडिग्स रिटायर्ड आऊट झाली आहे. जेेमिमाहने 28 बॉलमध्ये 34 रन्स केल्या. जेमिमाहनंतर ऋचा घोष मैदानात आली आहे.

  • 28 Jun 2026 08:18 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : जेमिमाह-हरमनप्रीत जोडी जमली, भारताच्या किती धावा?

    जेमिमाह रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर जोडी जमली आहे. या दोघींनी भारताला 16 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 118 रन्स केल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया उर्वरित 4 ओव्हरमध्ये किती धावा जोडण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 28 Jun 2026 07:58 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : अरे काय हे? स्मृती मंधाना रन आऊट, टीम इंडियाला दुसरा झटका

    जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मंधाना यांच्यातील संवादाच्या अभावामुळे भारताला दुसरा झटका लागला आहे. स्मृती मंधाना नॉन स्ट्राईक एन्डवर रन आऊट झाली. स्मृतीने 37 बॉलमध्ये 38 रन्स केल्या.

  • 28 Jun 2026 07:45 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : भारताला पहिला झटका, शफाली वर्मा आऊट

    ऑस्ट्रेलियाला अखेर स्मृती मंधाना-शफाली वर्मा ही सेट सलामी जोडी फोडण्यात यश आलं आहे. ऑस्ट्रेलियाने 10 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर भारताला पहिला झटका दिला आहे. कॅप्टन सोफी मॉलिनिक्स हीने शफालीला बोल्ड केलं. शफालीने 26 बॉलमध्ये 34 रन्स केल्या.

  • 28 Jun 2026 07:38 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : शफाली-स्मृती सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी, आता गिअर बदलण्याची गरज

    शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे. या दोघींनी भारताला 8 ओव्हरपर्यंत बिनबाद 54 धावांपर्यंत पोहचवलं आहे. स्मृती 29 आणि शफाली 23 धावांवर नाबाद खेळत आहेत. त्यामुळे आता या दोघींकडून फटकेबाजीची आशा आहे.

  • 28 Jun 2026 07:19 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : जबरदस्त, शफाली-स्मृतीची ऑस्ट्रेलिया विरुद्ध चाबूक सुरुवात

    शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने टीम इंडियाला अप्रतिम सुुरुवात करुन दिली आहे. या दोघींनी 4  ओव्हरमध्ये 29 रन्स केल्या आहेत. स्मृती 15 आणि शफाली 14 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 28 Jun 2026 07:04 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग, स्मृती-शफाली मैदानात

    ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया वुमन्स सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाकडून शफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 28 Jun 2026 06:54 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : ऑस्ट्रेलिया वुमन्स प्लेइंग ईलेव्हन

    ऑस्ट्रेलिया वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वॉल, फोबी लिचफील्ड, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिनक्स (कर्णधार), किम गर्थ आणि लुसी हॅमिल्टन.

  • 28 Jun 2026 06:52 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर आणि क्रांती गौड.
  • 28 Jun 2026 06:41 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडियाची निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटिंग

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. भारतीय कर्णघार हरमनप्रीत कौर हीने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता टीम इंडिया कांगारुसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 28 Jun 2026 06:38 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : ऑस्ट्रेलिया वुमन्स टीम

    बेथ मुनी (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स (कर्णधार), जॉर्जिया व्हॉल, एलिस पेरी, ऍशलेह गार्डनर, जॉर्जिया वेरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, अलाना किंग, किम गर्थ, लुसी हॅमिल्टन, फोबी लिचफिल्ड, मेगन शुट, ग्रेस हॅरिस आणि ताहलिया मॅकग्रा.

  • 28 Jun 2026 06:37 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया

    हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर) स्मृती मंधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर, नंदनी शर्मा, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, भारती फुलमाळी आणि प्रेमा रावत.

  • 28 Jun 2026 06:35 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडियासाठी करो या मरो सामना

    टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियासमोर आपल्या साखळी फेरीतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्याही स्थितीत विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारताचा या सामन्यात चांगलाच कस लागणार आहे.

Published On - Jun 28,2026 6:29 PM

Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...