INDvsWI 2nd ODI: अक्षर पटेलने SIX मारुन मॅच संपवली, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कसं धुतलं ते या VIDEO मध्ये पहा

INDvsWI 2nd ODI: भारताने काल सलग दुसरा सामना जिंकून वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत (IND vs WI) 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 312 धावांच लक्ष्य दिलं होतं.

INDvsWI 2nd ODI: अक्षर पटेलने SIX मारुन मॅच संपवली, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कसं धुतलं ते या VIDEO मध्ये पहा
IND vs WI Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 10:25 AM

मुंबई: भारताने काल सलग दुसरा सामना जिंकून वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत (IND vs WI) 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 312 धावांच लक्ष्य दिलं होतं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 2 विकेट आणि 2 चेंडू राखून विजय मिळवला. अक्षर पटेल (Axar Patel) भारताच्या विजयाचा नायक आहे. त्याच्या तुफान फलंदाजीमुळे भारताला हा विजय मिळवता आला. तत्पूर्वी करीयर मधील 100 वा वनडे सामना खेळणारा वेस्ट इंडिजचा सलामीवीर शाई होपने (Shai Hope) शानदार शतक झळकावलं. कॅप्टन निकोलस पूरनने 74 धावा बनवून त्याला चांगली साथ दिली. पण त्यांची ही खेळी वाया गेली. अक्षर पटेलने शेवटच्या ओव्हर मध्ये षटकार ठोकून एमएस धोनीचा 17 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला.

वेस्ट इंडिजचा विजयाच स्वप्न भंग पावलं

एकवेळ भारताची स्थिती 18 षटकानंतर 3 बाद 79 होती. त्यावेळी श्रेयस अय्यर (63) आणि संजू सॅमसनने (54) भारताचा डाव सावरला. दोघांनी आपआपली अर्धशतकं फटकावतानाच 99 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दीपक हुड्डा (33) आणि अक्षरने झटपट 50 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. अखेरच्या षटकात अक्षर पटेलने तुफान फटकेबाजी केली. त्याने 35 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या. यात 3 चौकार आणि 5 षटकार होते. आवेश खानने देखील दोन चौकार लगावले. त्यामुळे अखेरच्या 3 चेंडूत विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. अक्षर पटेलने त्यानंतर कायली मेयर्सने टाकलेल्या चौथ्या लो फुल टॉस चेंडूवर लाँग ऑफला षटकार खेचला. त्यामुळे वेस्ट इंडिजचा विजयाच स्वप्न भंग पावलं. भारताने दुसऱ्यासामन्यासह मालिकाही खिशात घातली.

दोन्ही सामान्यात रोमांचक विजय

भारतीय क्रिकेट संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने रोमांचकारी पद्धतीनं जिंकले आहेत.वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना चौकार मारता न आल्याने भारताने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मालिकेतील पहिला वनडे सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. त्याचवेळी भारताने 50 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार मारून दुसरा एकदिवसीय सामना जिंकला.अशा प्रकारे भारताने दोन्ही सामने रोमांचकारी पद्धतीने जिंकले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.