AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पाकिस्तानी क्रिकेटरला वाईट वागणूक, बाबर आझमने केली अशी तुलना

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी सर्वच संघ जोरदार तयारी करत आहे. पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून जोर लावला आहे. अमेरिकेत येण्यापूर्वी आर्मी कॅम्पमध्येही पाकिस्तानी खेळाडूंनी घाम गाळला. तसेच विजयाचा मंत्र घेतला. असं असताना सरावादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात कर्णधार बाबर आझम आपल्या संघातील खेळाडूचा अपमान केला आहे.

Video : पाकिस्तानी क्रिकेटरला वाईट वागणूक, बाबर आझमने केली अशी तुलना
| Updated on: Jun 03, 2024 | 8:16 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अ गटात भारतासोबत पाकिस्तानचा संघ आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला आहे. मागच्या काही दिवसात पाकिस्तानी संघात बरीच उलथापालथ झाली. पण सरतेशेवटी शाहीन आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून पुन्हा बाबर आझमकडे सोपवण्यात आलं. पण त्याच्या नेतृत्वातही काही चांगली कामगिरी होताना दिसत नाही. आयर्लंडने मालिकेत चांगलाच दम काढला. त्यानंतर इंग्लंडने व्हाईट वॉश दिल्याने पाकिस्तानचं मनोबळ पडलं आहे. असं असताना खेळाडूंना प्रोत्साहान देण्याऐवजी बाबर आझम त्यांचा अपमान करण्यात वेळ घालवत आहे. बाबर आझमने सराव दरम्यान आपल्या संघ सहकाऱ्याची तुलना थेट प्राण्यासोबत केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच पाकिस्तानी क्रीडाप्रेमी या व्हिडीओखाली आपल्या भावना व्यक्त करत आहेत. सराव दरम्यान पाकिस्तानचे खेळाडू रग्बी खेळताना दिसले. व्हिडीओच्या सुरुवातीलाच बाबर आझम हा आझम खानला गेंडा बोलताना दिसत आहे. त्यानंतर सर्वच खेळाडू हसू लागतात.

या व्हिडीओत पाकिस्तानचे 7-8 खेळाडू दिसत आहेत. या खेळाडूंना बॉल पकडायचा होता. जेव्हा सर्व खेळाडू सज्ज होतात तेव्हा आझम खान वेगळ्याच दुनियेत दिसतो. तेव्हा बाबर आझम आपल्या युवी खेळाडूकडे बोट दाखवत म्हणतो की, हा गेंडा अजून सरळ झालेला नाही. बाबर आझमने केलेल्या वक्तव्याला बॉडी शेमिंग किंवा फॅट शेमिंग म्हंटलं जातं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता लोकं बाबर आझमला ट्रोल करत आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा पहिला सामना 6 जूनला होणार आहे. यजमान अमेरिकेसोबत ही लढत होणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार इथपासून कोणता खेळाडू चमकदार कामगिरी करणार याची खलबतं सुरु आहेत.

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.