AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baharampur Election Final Result 2024: क्रिकेटर युसूफ पठाणचा दणदणीत विजय, काँग्रेसच्या 5 टर्म खासदाराचा उडवला धुव्वा

Baharampur Lok Sabha Election Final Result 2024: माजी क्रिकेटर यूसुफ पठाण याने लोकसभा निवडणुकीत विजयी सलामी दिली आहे. यूसफने दिग्गज अधिर रंजन चौधरी यांचा धुव्वा उडवला आहे.

Baharampur Election Final Result 2024: क्रिकेटर युसूफ पठाणचा दणदणीत विजय, काँग्रेसच्या 5 टर्म खासदाराचा उडवला धुव्वा
yusuf pathan Baharampur Lok sabha election
| Updated on: Jun 04, 2024 | 7:41 PM
Share

टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि वनडे वर्ल्ड कप 2011 विजेता संघातील टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर यूसुफ पठाण याने इतिहास रचला आहे. यूसफ पठाण याने बहारमपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. यूसुफ पठाणने काँग्रेसचे मातब्बर आणि 5 वेळा खासदार असलेले अधिर रंजन चौधरी यांचा पराभव केला आहे. यूसुफने पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यूसफ पठाणने पहिल्याच झटक्यात दिग्गज नेत्याचा धुव्वा उडवल्याने सोशल मीडियावर क्रिकेटरचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे.

बहारमपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि एआयटीसी अशी तिरंगी लढत होती. काँग्रसकडून अधिर रंजन चौधरी, भाजपकडून डॉक्टर निर्मल कुमार साहा आणि एआयटीसीकडून युसूफ पठाण या तिघांमध्ये मुख्य लढत होती. मात्र मतदारांनी युसूफ पठाण याच्यावर विश्वास दाखवत तब्बल 25 वर्षांनी खासदार बदलला. अधिर रंजन चौधरी हे या मतदारसंघातून 1999 पासून सलग खासदार म्हणून विजयी झाले. मात्र यंदा मतदारांनी चौधरी यांना विजयी षटकार मारण्यापासून रोखलं. तर युसूफ पठाण याच्यावर विश्वास दाखवला.

कुणाला किती मतं?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांच्या आकडेवारीनुसार, युसूफ पठाण याला एकूण 5 लाख 22 हजार 974 मतं मिळाली आहेत. अधिर रंजन चौधरी यांना दुसऱ्या क्रमांकाची मंत मिळाली आहेत. चौधरी यांना 4 लाख 37 हजार 646 मतं आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या डॉक्टर निर्मल कुमार साहा यांच्या पदरात 3 लाख 69 हजार 867 मतं पडली आहेत.

मतदारांकडून 25 वर्षांनी बदल

अधिर रंजन चौधरी हे गेल्या 25 वर्षांपासून या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. बहरामपूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिलल्ला होता. मात्र युसूफ पठाणने काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत इतिहास रचला. त्यामुळे युसूफ पठाणचं सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

युसूफ पठाणचा खास यादीत समावेश

क्रिकेट आणि राजकारण याचा गेल्या अनेक वर्षांपासून जवळचा संबंध राहिला आहे. क्रिकेटमधील इनिंग संपल्यानंतर अनेक खेळाडूंनी राजकारणात पदार्पण केलं. तर काही दिग्गज क्रिकेटपटू हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि खासदारही झाले. त्यामध्ये गौतम गंभीर, नवज्योत सिंह सिद्धू, मोहम्मद अजहरुद्दीन, कीर्ती आझाद आणि चेतन चौहान यांचा समावेश आहे. आता या यादीत युसूफ पठाण याचं नाव जोडलं गेलं आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.