AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs BAN : बांगलादेश न्यूझीलंडमध्ये पहिली टी20 मालिका जिंकणार! पहिल्या विजयानंतर दुसऱ्या सामन्यात झालं असं…

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत बांगलादेशने न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं होतं. आता दुसऱ्या सामन्यात ट्वीस्ट आल्याने मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान न्यूझीलंडसमोर उभं ठाकलं आहे.

NZ vs BAN : बांगलादेश न्यूझीलंडमध्ये पहिली टी20 मालिका जिंकणार! पहिल्या विजयानंतर दुसऱ्या सामन्यात झालं असं...
NZ vs BAN : न्यूझीलंडवर मालिका बरोबरीत सोडवण्याची नामुष्की, बांगलादेशला दुसऱ्या सामन्यात झाला असा फायदा
| Updated on: Dec 29, 2023 | 5:50 PM
Share

मुंबई : बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यातील ट्वीस्टमुळे न्यूझीलंडचं टेन्शन वाढलं आहे. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे दुसऱ्या सामन्यात कमबॅक करण्याची न्यूझीलंडसमोर संधी होती. पण 11 षटकांचा खेळ झाला आणि सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे बांगलादेशला फायदा झाला आहे. तर न्यूझीलंडला तिसऱ्या सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असणार आहे. पावसामुळे बांगलादेशचं खऱ्या अर्थाने फायदा झाला असंच म्हणावं लागेल. तसेच विदेशी भूमीवर पहिल्यांदा टी20 मालिका जिंकण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. आता तिसऱ्या टी20 सामन्यात बांगलादेश कशी कामगिरी करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. पण न्यूझीलंड बांगलादेशला सहजासहजी विजयी मिळवून देईल असं वाटत नाही. दुसऱ्या टी20 सामन्यात बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

दुसऱ्या षटकातच न्यूझीलंडला फिन एलनच्या रुपाने धक्का बसला. शोरिफुल इस्लामने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 5 चेंडूत 2 धावा केल्या होत्या. त्यानंतर टिम सेफर्ट आणि डेरिल मिचेलने डाव सावरला. टिम सेफर्ट 23 चेंडूत 43 धावा करून तंबूत परतला. तान्झिम हसन साकिबच्या गोलंदाजीवर नजमुल होसेनने त्याचा झेल घेतला. तर खेळ रद्द होण्यापूर्वी डेरिल मिचेल नबाद 18 आणि ग्लेन फिलिप्स नाबाद 9 धावांवर खेळत होता.

स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता पावसाने हजेरी लावली. तेव्हा 11 षटकात न्यूझीलंडची 2 बाद 72 अशी स्थिती होती. त्यानंतर 5 षटकांच्या खेळाची कट ऑफ वेळ रात्री 10 वाजून 28 मिनिटांनी निश्चित करण्यात आली. पण पावसाचा जोर कमी झाला नाही आणि पंचांकडून रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी खेळ रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. तिसर्‍या आणि शेवटच्या टी20 साठी दोन्ही संघ आता नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला याच ठिकाणी भेटतील.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): फिन एलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सॅन्टनर (कर्णधार), एडम मिल्ने, टीम साऊदी, ईश सोढी, बेन सियर्स.

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): सौम्या सरकार, रॉनी तालुकदार (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शमीम हुसेन, तौहीद हृदयॉय, अफिफ हुसैन, महेदी हसन, तनझिम हसन साकिब, शोरीफुल इस्लाम, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.