AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी, टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, पुजारा-रहाणेला डच्चू, रोहित शर्मा कर्णधार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या आगामी T20I आणि कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघांची निवड केली आहे. टीम इंडिया लखनौ आणि धर्मशाला येथे अनुक्रमे तीन T20I आणि मोहाली आणि बेंगळुरू येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी, टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, पुजारा-रहाणेला डच्चू, रोहित शर्मा कर्णधार
Ajinkya Rahane, Cheteshwar Pujara
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 19, 2022 | 5:17 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या आगामी T20I आणि कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघांची निवड केली आहे. टीम इंडिया लखनौ आणि धर्मशाला येथे अनुक्रमे तीन T20I आणि मोहाली आणि बेंगळुरू येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे. भारताच्या कसोटी संघातून अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोघांना डच्चू दिला आहे. दोन्ही खेळाडू गेल्या एक ते दीड वर्षांपासून आऊट ऑफ फॉर्म आहेत. दोघेही खेळपट्टीवर सातत्याने धावांसाठी संघर्ष करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीने कसोटी संघातून या दोघांना वगळलं आहे.

रहाणे आणि पुजाराच्या जागी प्रियांक पांचाळ आणि श्रेयस अय्यरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं जाईल. तर रोहित शर्मासोबत मयंक अग्रवाल किंवा शुभमन गिल सलामीला मैदानात उतरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुजाराच्या जागेसाठी हनुमा विहारीदेखील प्रबळ दावेदार आहे. दरम्यान, रवींद्र जाडेजाने टीम इंडियात पुनरागमन केलं आहे.

भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)

भारताचा टी-20 संघ : भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान

संघातून कोण बाहेर गेलं? चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, ऋद्धिमान साहा संघातून बाहेर

फिटनेसमुळे केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांचा श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजसाठी आराम देण्यात आला आहे. शार्दुल टेस्ट आणि टी-20 दोन्ही संघांमध्ये नसणार आहे.

इतर बातम्या

23 वर्षीय फलंदाजाची कमाल, रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियातला रेकॉर्ड मोडित

IND vs WI: सामन्यानंतर रोहित शर्माला नाराजी लपवता आली नाही, म्हणाला….

Rishabh Pant: सीरीज सुरु असताना मध्यावरच BCCI ने ऋषभ पंतला दिला आराम

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली