AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy 2025 : बीसीसीआयकडून चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता टीम इंडियावर पैशांचा पाऊस, इतक्या कोटींचं बक्षिस

Icc Champions Trophy 2025 Cash Prize Bcci For Rohit Sharma : टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. बीसीसीआयने टीम इंडियाच्या या कामगिरीसाठी रोख बक्षिस जाहीर केलं आहे.

Champions Trophy 2025 : बीसीसीआयकडून चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता टीम इंडियावर पैशांचा पाऊस, इतक्या कोटींचं बक्षिस
Team India Icc Champions Trophy Winner 2025Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 20, 2025 | 4:37 PM

टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 9 मार्चला न्यूझीलंडवर मात करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण आणि सर्वाधिक तिसरी वेळ ठरली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. या ऐतिहासिक विजयाच्या काही दिवसांनंतर आता बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघांसाठी बक्षिस राशी जाहीर केली आहे. बीसीसीआयने भारतीय संघावर पैशांचा पाऊस पाडला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची घोषणा केली आहे.

बीसीसीआयकडून 58 कोटींचं रोख बक्षिस जाहीर

बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी विजेच्या संघातील खेळाडूंसह, कोच आणि सपोर्ट स्टाफ या सर्वांसाठी 20 मार्च रोजी 58 कोटी रुपये बक्षिस रक्कम जाहीर केली आहे. तसेच बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कर्णधार रोहित शर्मासह इतर सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

“भारताने कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात या स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला. टीम इंडिया सलग 4 विजयासह अंतिम फेरीत पोहचली. टीम इंडियाने बांगलादेशवर 6 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवला. तसेच न्यूझीलंडला 44 धावांनी मात करुन विजयी घोडदौड कायम ठेवली. त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने विजय मिळवला “, अशा शब्दात बीसीसीआयने टीम इंडियाच्या कामगिरीचं कौतुक केलंय.

“बीसीसीआयने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील विजयानंतर टीम इंडियासाठी 58 कोटी रुपयांचं रोख बक्षिस जाहीर करताना आनंदी आहे. खेळाडू, कोच, सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीतील सदस्यांना सन्मानित करताना हे रोख बक्षिस जाहीर केलं जात आहे”, असंही बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

बीसीसीआयने टीम इंडियासाठी पेटारा उघडला

टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर 125 कोटी

दरम्यान टीम इंडियाची गेल्या 9 महिन्यांतील ही दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी 2024 या वर्षात टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हाही बीसीसीआयने आपला पेटारा उघडला होता. बीसीसीआयने टीम इंडियासाठी 125 कोटी रुपये प्राईज मनी म्हणून जाहीर केले होते.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.