AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर भारतीय संघ आनंदी, प्रत्येकानं सांगितल्या मनातील भावना, पाहा VIDEO

भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानात 2014 नंतर प्रथमच विजय मिळवत पुन्हा एकदा सोनेरी आठवणींना उजाळा दिला. या आनंदाच्या क्षणी भारतीय खेळाडूंनी आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर भारतीय संघ आनंदी, प्रत्येकानं सांगितल्या मनातील भावना, पाहा VIDEO
भारतीय संघ
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 4:00 PM
Share

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात लॉर्ड्च्या ऐतिहासिक मैदानात पार पडलेल्या सामन्यात भारताने  इंग्लंडवर 151 धावांनी मात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. इंग्लंड संघासोबत पूर्वीपासूनचं सामने अत्यंत चूरशीचे होत असतात. त्यामुळे हा विजय कोट्यवधी भारतीयासांठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यात लॉर्ड्स मैदानात सामना जिंकल्याचा आनंद प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर दिसत होता. दरम्यान या विजयानंतर प्रत्येक खेळाडूच्या भावना एका छोट्या व्हिडीओच्या स्वरुपात बीसीसीआयने (BCCI) शेअर केल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये सर्वात आधी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हणतो, ”आम्ही याआधीही अनेक परदेशात जाऊन सामने जिंकले आहेत. पण आजचा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. याचं संपूर्ण श्रेय सर्व संघाला जातं.” विराटनंतर उपकर्णधार अजिंक्यने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”संपूर्ण संघाने अप्रतिम कामगिरी केली. पण दुसऱ्या डावातील खेळ विजयात महत्त्वाचा ठरला. हा विजय आमच्यासाठी खूप खास आहे.”

सलामीवीर रोहित-राहुल म्हणाले…

सामन्यात सुरुवातीला एक भक्कम अशी शतकी भागिदारी करुन देणारे भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनीही आपल्या भावना शेअर केल्या. रोहित म्हणाला, ”हा विजय एक किंवा दोन जणांनी नाही, तर संपूर्ण 11 जणांनी मिळून मिळवून दिला आहे. प्रत्येकानी गरजेच्या वेळी आपला खेळ दाखवत सामना विजयाच्या दिशेने नेला.” तर राहुल म्हणाला,”इंग्लंडसारख्या देशात विजय मिळवणं एक मोठी आणि खास गोष्ट आहे. मागील 2.5 महिन्यांहून अधिक काळ आम्ही सराव केल्याचं हे फळ आहे.”

ही कामगिरी कायम ठेवण्याकडे लक्ष – पुजारा

सामन्यात काही खास कामगिरी केली नसली तरी गरजेच्या क्षणी रहाणेसोबत ठामपणे उभा राहिलेल्या चेतेश्वर पुजाराने देखील आनंद व्यक्त केला. पण आणखी तीन सामने शिल्लक असून अशीच कामगिरी कायम ठेवणे गरजेचे असल्याचे पुजारा म्हणाला. व्हिडीओत अखेर गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी हिंदीत प्रतिक्रिया देत आपलं मत मांडले. शमीने या विजयानंतरचा आत्मविश्वास पुढील सामन्यात ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तर सिराजने देशासाठी अशाप्रकारे सामना जिंकवून देणं माझ्यासाठी खूप अभिमानास्पद असल्याचं सांगितलं.

इतर बातम्या

IND vs ENG : असं काय घडलं? ज्यानंतर भारताने सामना अनिर्णीत न सोडता जिंकायचाच ठरवलं, विराटने दिलं उत्तर

IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO

(BCCI Shares Video of indian players reaction after winning lords test against England)

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...