AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कोहली प्रेमानंदजी महाराजांच्या चरणी, मिळालं अपयशाचं उत्तर आणि…Video

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने प्रेमानंदजी महाराजांच्या चरणी हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या फलंदाजीतून हव्या तशा धावा येत नाहीत. त्यामुळे टीकेचा धनी ठरला आहे. विराट कोहली आपल्या फॉर्मसाठी झटत आहे. असं असताना त्याने प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. यावेळी त्याला काही प्रश्नांची उत्तर तिथे मिळाली.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कोहली प्रेमानंदजी महाराजांच्या चरणी, मिळालं अपयशाचं उत्तर आणि...Video
| Updated on: Jan 10, 2025 | 4:26 PM
Share

विराट कोहलीसाठी मागचं वर्ष काही खास राहिलं नाही. एखाद दुसऱ्या सामन्यात त्याची बॅट चालली असेल पण फार काही ग्रेट केलं नाही. पण अनुभवी फलंदाज असल्याने त्याची संघात जागा आहे. मागच्या खेळी आणि त्याच्या अनुभवाची शिदोरी पाहता त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी स्थान मिळणार यात काही शंका नाही. पण विराट कोहली त्याच दमाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत धावा करणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने शतक केलं. पण त्यानंतर त्याची गाडी पुन्हा एकदा रुळावरून घसरली. इतकंच काय तर अनेकांनी सोशल मीडियावरून त्याने निवृत्त व्हावं अशी टीकाही केली. असं सर्व वातावरण असताना विराट कोहली प्रेमानंदजी महाराजांच्या दर्शनाला गेला. तिथे प्रेमानंद महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. तसेच काही प्रश्नांची उत्तरंही देऊन टाकली. त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विराट कोहली आपल्या कुटुंबासह तिथे हात जोडून बसल्याचं दिसत आहे.

प्रेमानंदजी महाराज यांनी विराट कोहलीला विचारलं की, बरा आहेस ना.. तेव्हा कोहलीने आपलं डोकं हलवत हा असं उत्तर दिलं. प्रेमानंदजी महाराजांनी नंतर सांगितलं की, ‘कोहली खेळाच्या माध्यमातून सेवा करत आहे आणि त्याला परमेश्वराकडून जे काही प्राप्त झालं आहे त्याच्या उच्चतम पातळीवर आहे. पण सरावात कोणतीच उणीव नसावी. पण प्रारब्ध असतात. काही अशुभ प्रारब्ध असले की अपयश मिळतं. पण सरावात कोणतीच कमतरता नसावी.’

‘सराव पूर्ण असेल आणि प्रारब्धही पूर्ण असेल तर विजय निश्चित मिळतो. पण चांगला सराव करूनही कधी कधी प्रारब्धही आडवं येतं. त्यामुळे दु:ख भोगावं लागतं. अन्य लोकांच्या प्रभावामुळे चांगली कामगिरी करूनही अपयश मिळतं. कारण हा खेळ एकट्याचा नाही. त्यामुळे देवाचं नामस्मरण करून धीर ठेवावा लागेल. कठीण आहे पण अपयशात धीराने हसत पुढे निघून जाणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आता अपयश राहणार नाही. जर दिवस राहात नाही तर रात्र तरी कशी राहील.’, असं प्रेमानंदजी महाराज यांनी विराट कोहली याला सांगितलं.

पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्...
पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्....
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!.
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्...
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्....
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?.
अर्ज भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशी मोठी गर्दी, कुठं काय स्थिती?
अर्ज भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशी मोठी गर्दी, कुठं काय स्थिती?.
...तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? सुषमा अंधारेंचा थेट सवाल
...तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? सुषमा अंधारेंचा थेट सवाल.
पुतळ्याचं अनावरण 4 महिने अनावरण का रखडलं? अमित ठाकरेंचा थेट सवाल
पुतळ्याचं अनावरण 4 महिने अनावरण का रखडलं? अमित ठाकरेंचा थेट सवाल.
मोठी बातमी! आता बिबट्याचीही नसबंदी, बिबट्यांची दहशत अन् वावर कमी होणार
मोठी बातमी! आता बिबट्याचीही नसबंदी, बिबट्यांची दहशत अन् वावर कमी होणार.
बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्याचा उच्छाद; थेट पडला विहिरीत
बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्याचा उच्छाद; थेट पडला विहिरीत.
नीच... जरांगेंचा अजितदादांसह फडणवीसांवर गंभीर आरोप अन् मुंडेंवर निशाणा
नीच... जरांगेंचा अजितदादांसह फडणवीसांवर गंभीर आरोप अन् मुंडेंवर निशाणा.