AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : वेस्ट इंडिज सामन्यापूर्वी आर. अश्विन याने चेतेश्वर पुजारा याच्याबाबत केला मोठा खुलासा, उघड केलं असं गुपित

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या मालिकेतून चेतेश्वर पुजारा याला डच्चू देण्यात आला आहे. असं असताना आर. अश्विनने केलेल्या खुलाश्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे.

IND vs WI : वेस्ट इंडिज सामन्यापूर्वी आर. अश्विन याने चेतेश्वर पुजारा याच्याबाबत केला मोठा खुलासा, उघड केलं असं गुपित
IND vs WI : चेतेश्वर पुजारा याच्याबाबत काय सांगून गेला आर. अश्विन, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का
| Updated on: Jul 12, 2023 | 8:32 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीतील पहिला सामना टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध खेळत आहे. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये बदल करण्यात आले आहेत. कसोटी स्पेशल म्हणून ख्याती असलेल्या चेतेश्वर पुजारा याला या मालिकेतून वगळण्यात आलं आहे. तर नवोदीत यशस्वी जयस्वाल याला संधी देण्यात आली आहे. चेतेश्वर पुजारा याला डावलल्याने काही माजी खेळाडूंना प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दुसरीकडे, चेतेश्वर पुजाराबाबत आर. अश्विन याने मोठा खुलासा केला आहे. चेतेश्वर पुजारा फिटनेस आणि शेड्युलच्या बाबतीत कडक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पुजारा अलर्ट असतो असा खुलासा आर. अश्विनने केला आहे.

काय करतो चेतेश्वर पुजारा

आर. अश्विनने सांगितलं की, चेतेश्वर पुजारा प्रत्येक गोष्टींचं शेड्युल तंतोतंत पाळतो. इतकंच काय तर सफरचंद खाण्यासाठीही अलार्म सेट करून ठेवतो. चेतेश्वर पुजारा एका ठराविक वेळेत सफरचंद खाणं पसंत करतो. यासाठी तो अलार्म सेट करून ठेवतो. त्यावेळेस सफरचंद खाणं चूकतच नाही.

पुजाराचा दिनक्रम कसा असतो

आर. अश्विन याने आपल्या युट्यूब चॅनेलवर आणखी काही खुलासे केले आहेत. “पुजारा दिवसभरात काय करायचं याबाबत फोकस्ड असतो. एक सफरचंद खाण्यासाठी तो साडेसात वाजताचा अलार्म लावतो. तसेच तो त्यावेळेस सफरचंद खातो.”, असं आर. अश्विन याने सांगितलं.

भारतीय फिल्डिंग कोच टी दिलीप यांनीही केला खुलासा

चेतेश्वर पुजारा सरावाबाबत खूपच सिरियस आहे. नेटमध्ये प्रॅक्टिससाठी केल्यानंतर 20 झेल घ्यायचे आहेत याबाबत ठरवायचा, असं कोच टी दिलीप यांनी सांगितलं. “दक्षिण आफ्रिकेत अजिंक्य रहाणे आणि पुजारा सध्या साडेसात वाजताच जेवत होते. त्यानंतर चेतेश्वर माझ्याकडे आला आणि सांगितलं की मला आता 20 झेल पकडायचे आहेत. त्याने तसंच केलं. 20 झेल घेतल्यानंतर मैदान सोडलं.”

चेतेश्वर पुजाराचं संघात पुनरागमन होणं कठीण!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत चेतेश्वर पुजाराकडून फार अपेक्षा होत्या. मात्र या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 27 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराचं वय पाहता त्याचं कसोटी संघात पुनरागमन होणं तसं कठीण आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत त्याच्याऐवजी संघात यशस्वी जयस्वाल याला स्थान देण्यात आलं आहे. दुसरीकडे पुजाराच्या स्थानावर शुभमन गिल बॅटिंग करणार आहे.

बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.