AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: भारताविरोधात ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ गोलंदाजाच्या नावे लाजिरवाणा विक्रम

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील (Australia vs India 4th Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ नुकताच संपला आहे.

IND vs AUS: भारताविरोधात ऑस्ट्रेलियाच्या 'या' गोलंदाजाच्या नावे लाजिरवाणा विक्रम
| Updated on: Jan 17, 2021 | 3:11 PM
Share

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील (Australia vs India 4th Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ नुकताच संपला आहे. आज सकाळी कालच्या 2 बाद 62 धावांवरुन भारताने सुरुवात केली. भारताने या सामन्यात 111 षटकांमध्ये 336 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात झाल्यापासून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय संघावर वर्चस्व गाजवलं. जोश हेजलवूड, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, नेथन लायन या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना चांगलंच जखडून ठेवलं होतं. परंतु एका बाजूला कांगारु कसलेली गोलंदाजी करत असताना त्यांचा एक गोलंदाज मात्र अपयशी ठरला आहे. या गोलंदाजाने आज एक लाजिरवाणा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. (Cameron Green go wicketless for more than 240 balls against India)

त्या गोलंदाजांचं नाव जाणून घेण्यापूर्वी तो लाजिरवाणा विक्रम काय आहे ते आधी समजून घ्या. हा विक्रम विकेट्सच्या दुष्काळाचा आहे. एखाद्या कसोटी सामन्यात जास्तीत जास्त चेंडू गोलंदाजी करुनही विकेट न मिळाल्याचा हा रेकॉर्ड आहे. 7 वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 साली हा रेकॉर्ड मध्यमगती गोलंदाज मिचेल मार्शच्या नावावर होता. मार्शने पाकिस्तानविरोधात 240 चेंडू टाकले होते. परंतु या 240 चेंडूंमध्ये त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. मार्शचा हा लाजिरवाणा विक्रम सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत कॅमेरुन ग्रीन याने मोडीत काढला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या कसोटी मालिकेद्वारे कॅमरुन ग्रीनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. परंतु आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच कॅमरुन ग्रीन गोलंदाजीत फेल गेला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज कॅमेरुन ग्रीनने मिचेल मार्शचा 240 चेंडूपर्यंत विकेट मिळवू न शकल्याचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे ग्रीनचा हा दुष्काळ अजूनही सुरुच आहे. ग्रीनला अद्याप एकही विकेट मिळालेली नाही. भारताच्या पहिल्या डावात ग्रीनने 8 षटकं गोलंदाजी केली. अद्याप त्याला एकही विकेट घेता आली नाही.

भारताच्या दुसऱ्या डावात तरी त्याला विकेट मिळते का ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच त्याच्या आतापर्यंतच्या प्रभावहीन गोलंदाजीनंतर ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेन त्याच्या हाती चेंडू सोपवतो का ते पाहणेदेखील महत्त्वाचे आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना अधिक रंगतदार झाला आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 369 धावा उभारल्यानंतर भारताने पहिल्या डावात 336 धावां उभारल्या आहेत. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या झुंजार अर्धशतकांच्या जोरावर भारताने 300 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवसखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद 21 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे आता कांगारुंकडे एकूण 54 धावांची आघाडी घेतली आहे. सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी आहेत.

संबंधित बातम्या

तुला परत मानलं रे ठाकूर, शार्दूलच्या बॅटिंगवर विराट कोहली फिदा, मराठीत कौतुक

शार्दूल-वॉशिंग्टनची शानदार खेळी, ब्रिस्बेनवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

रिषभ पंतची धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी हुकली

(Cameron Green go wicketless for more than 240 balls against India)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.