AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs CSK : राजस्थानकडून दारूण पराभव झाल्यानंतर कर्णधार ऋतुराजने असं सांगितलं कारण

आयपीएल 2026 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं वजन दिसलं. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघ फक्त 127 धावा करू शकला. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने फक्त 12.1 षटकात पूर्ण केलं.

RR vs CSK : राजस्थानकडून दारूण पराभव झाल्यानंतर कर्णधार ऋतुराजने असं सांगितलं कारण
राजस्थानकडून दारूण पराभव झाल्यानंतर कर्णधार ऋतुराजने असं सांगितलं कारणImage Credit source: CSK TWITTER
| Updated on: Mar 30, 2026 | 11:08 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात खूपच निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने दारूण पराभव केला. नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. खरं तर या सामन्यात 200 पार धावांची गरज होती. पण चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांचं काही एक चाललं नाही. एकापाठोपाठ एक धडाधड विकेट पडत गेल्या. दहाव्या विकेटसाठी ओव्हरटन आणि अंशुल कंबोजने 33 धावांची भागीदारी केली म्हणून 127 धावा करू शकले. या धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीचं वादळ घोंघावलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने 12.1 षटकात 2 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं. या विजयामुळे राजस्थान रॉयल्सला नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. राजस्थान रॉयल्सला 2 गुण मिळाले. इतकंच काय तर +4.171 नेट रनरेट झाला आहे. या पराभवाचं चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विश्लेषण केलं.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘सुरुवातीला खेळपट्टी खूपच कठीण होती. फिरकी गोलंदाजांनाही थोडी मदत मिळत होती. तुम्हाला फक्त खेळत राहायचं असतं. खेळपट्टी थोडी कठीण होती. तुम्ही ते विसरून पुढे जायचं, तीन दिवसांनी आमचा दुसरा सामना आहे. संघात बरेच तरुण खेळाडू आहेत. मी अंतिम विजयावर ठाम विश्वास ठेवणारा नाही. महत्त्वाच्या खेळाडूच्या बाबतीत, सरासरी धावसंख्या किती असावी हे निश्चित नसतं. फलंदाजांसाठी फक्त आपल्या खेळावर विश्वास ठेवण्यावर भर होता. आज ते जमलं नाही. आम्ही फलंदाजीमध्ये अधिक चांगली कामगिरी करू शकतो.’

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग म्हणाला की, नाणेफेकीत मी नशीबवान ठरलो. आम्हाला माहित होतं की दमटपणाचा परिणाम होणार आहे. प्रत्येकाने आपापल्या योजनांची अंमलबजावणी केली. यासाठी खूप तयारी झाली आहे. यावर्षी ट्रॉफी जिंकणे हे आमचे ध्येय आहे. आम्हाला एक असा संघ बनायचे आहे जो स्मार्ट क्रिकेट खेळेल. ब्रिजेशने जे केले ते अविश्वसनीय होते. मी वैभवला सांगतो की तो 14 सामने खेळणार आहे. आणि तो जाऊन असे काहीतरी करतो. तो माझ्या संघात असल्याचा मला खूप आनंद आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...