AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बलात्कार प्रकरणानंतर श्रीलंकेचा आणखी एक क्रिकेटपटू वादात, बोर्डाने घातली एक वर्षाची बंदी

वादात अडकलेला तो क्रिकेटपटू कोण?

बलात्कार प्रकरणानंतर श्रीलंकेचा आणखी एक क्रिकेटपटू वादात, बोर्डाने घातली एक वर्षाची बंदी
srilanka Image Credit source: Getty Images
| Updated on: Nov 24, 2022 | 1:54 PM
Share

कोलंबो: आशिय कप जिंकल्यानंतर श्रीलंकन टीमच टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 राऊंडमध्ये आव्हान संपुष्टात आलं. सध्या श्रीलंकन टीम चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. खेळाडूंच्या बेशिस्तीमुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या अडचणी वाढल्या आहेत. दानुष्का गुणतिलका ऑस्ट्रेलियात बलात्काराच्या आरोपात अडकला. त्यानंतर आता चामिका करुणारत्ने अडचणीत आलाय. बोर्डाने त्याच्यावर कारवाई केलीय.

काय आहेत आरोप?

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने 23 नोव्हेंबरला एका स्टेटमेंट जारी केलं. करुणारत्नेवर कॉन्ट्रॅक्ट नियमांच उल्लंघन केल्याचा आरोप केला व एक वर्ष बंदीची कारवाई केली. करुणारत्नेवर सध्या हे निर्बंध लागू होणार नाहीत. कारण बोर्डाने ही शिक्षा तूर्तास निलंबित केली आहे. म्हणजेच या काळात तो राष्ट्रीय टीमकडून खेळू शकतो. एक वर्षात तो पुन्हा दोषी आढळला, तर त्याच्यावर प्रतिबंध लागू होतील.

आपल्या चूका मान्य

प्रतिबंधाशिवाय करुणारत्नेला 5 हजार डॉलर्सचा दंडही ठोठावलाय. करुणारत्नेने कुठल्या नियमांच उल्लंघन केलं, ते बोर्डाने आपल्या पत्रकात स्पष्ट केलेलं नाही. ऑलराऊंडर करुणारत्नेने आपल्या चूका मान्य केल्याचं बोर्डाने सांगितलय. करुणारत्ने 26 वर्षांचा आहे. अलीकडेच टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या टीमचा तो सदस्य आहे. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तो अपयशी ठरला. 7 मॅचेसमध्ये त्याने फक्त 32 धावा आणि 3 विकेट एवढच योगदान दिलं.

मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.