AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : औपचारिक सामना भारताला जिंकावाच लागणार, नाही तर अंतिम फेरी विसरा! गणित समजून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साखळी फेरीतील अंतिम सामना होत आहे. पण या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे हा औपचारिक सामना आहे असंच क्रीडाप्रेमींना वाटत आहे. पण तसं नाही. या सामन्यातील पराभव दोन्ही संघांना महागात पडू शकतो. कसं ते समजून घ्या

IND vs NZ : औपचारिक सामना भारताला जिंकावाच लागणार, नाही तर अंतिम फेरी विसरा! गणित समजून घ्या
भारत विरुद्ध न्यूझीलंड
| Updated on: Feb 28, 2025 | 3:52 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट दोन संघांना मिळालं आहे. अ गटातून भारत आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर ब गटात उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चुरस आहे. साखळी फेरीत अ गटातील शेवटचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. तसं पाहिलं तर हा सामना औपचारिक आहे. या सामन्याच्या जय पराजयाने उपांत्य फेरीच्या निकालावर काही परिणाम होणार नाही. पण असा विचार करून गाफील राहण्यात अर्थ नाही. साखळी फेरीत चार संघांना अशाच विचारामुळे फटका बसला. पाकिस्तान-बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया-दक्षिण अफ्रिका सामन्यात पावसाने हजेरी लावली. यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका संघांचं सामना न झाल्याने नुकसान झालं. प्रत्येकाच्या वाटेला 1 गुण आला आणि उपांत्य फेरीचं गणित जर तरवर येऊन ठेपलं. असं असताना भारत न्यूझीलंड सामन्यामुळे काय परिणाम होईल असा प्रश्न पडला असेल. तर जाणून घ्या काय होऊ शकतं.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी फेरीचा सामना होत आहे. हा सामना गमवणं दोन्ही संघांना महागात पडू शकतं. जर या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर भारताला पुढच्या प्रवासात नक्कीच त्रास होऊ शकतो. सध्या गुणतालिके न्यूझीलंडचा संघ 4 गुणांसह अव्वल स्थानी आहे. कारण भारतापेक्षा न्यूझीलंडचा नेट रनरेट हा चांगला आहे. या गटात भारताला टॉपला जायचं असेल तर सामना जिंकण्याशिवाय पर्याय नाही. कारण या विजयावर भारताचं उपांत्य फेरीचं गणित अवलंबून असणार आहे.

भारताचा उपांत्य फेरीचा सामना 4 मार्चला होणार आहे. यावेळी भारतीय संघ टॉपला राहिल्यास ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी, जर दुसऱ्या स्थानी राहिला तर ब गटातील पहिल्या स्थानावरील संघाशी सामना करेल. आयसीसीने बाद फेरीसाठी राखीव दिवस ठेवला आहे. भारताचा सामना पावसामुळे या दिवशी झाला नाही तर 5 मार्चला हा सामना होईल. 4 मार्चला सामना जिथे थांबला तेथून पुढे 5 मार्चला सुरुवात होईल.

दोन्ही बाजूने 20 षटकांचा खेळ झाला असेल आणि राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावली तर डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल दिला जाईल. पण तसंही झालं नाही आणि पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली तर अ गटातील टॉपला असलेल्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे ही शक्यता पाहता भारताला अ गटात टॉपला राहावंच लागेल. यासाठी साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करण्याशिवाय पर्याय नाही.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....