AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy 2025 : टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीची मोठी घोषणा! नक्की काय?

India vs Pakistan Champions Trophy 2025 : स्पर्धा कोणतीही असो, खेळ कोणताही असो, टीम इंडिया-पाकिस्तान म्हटलं की साऱ्या क्रीडा विश्वाचं लक्ष आपसूक त्या सामन्याकडे असतं. चॅम्पियन्स ट्रॉफीत 23 फेब्रुवारीला या 2 शेजारी देशांचे क्रिकेट संघ आमनसामने असणार आहेत.

Champions Trophy 2025 : टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीची मोठी घोषणा! नक्की काय?
pakistan vs india cricket
| Updated on: Feb 11, 2025 | 10:52 AM
Share

बहुप्रतिक्षित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला बुधवार 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. गतविजेता राहिलेल्या पाकिस्तानकडे स्पर्धेचं यजमानपद आहे. त्यामुळे टीम इंडियाचे संपूर्ण सामने हे दुबईत होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने पार पडणार आहे. या स्पर्धेतील एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. त्यानुसार टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड ए ग्रपुमध्ये आहेत. तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड बी ग्रुपमध्ये आहेत.

टीम इंडिया या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. तर साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना 2 मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. मात्र साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे 23 फेब्रुवारीला होणार्‍या महामुकाबल्याकडे लागून राहिलं आहे. या 23 तारखेला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. या सामन्यात अंपायर कोण असणार? याबाबत अंतिम निर्णय झाला आहे.

टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यात अंपायर कोण?

भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असतं. या अशा सामन्यात एक निर्णय ही गेमचेंजर ठरु शकतो. त्यामुळे पंचांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे आयसीसीने या सामन्यासाठी अनुभवी पंचांची नियुक्ती केली आहे. पॉल रायफल आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे दोघे फिल्ड अंपायर असणार आहेत. मायकल गॉफ टीव्ही अंपायर असणार आहेत. तर एड्रियन होल्डस्टॉक हे फोर्थ अंपायर असतील. तर डेव्हिड बून मॅच रेफरी असतील. हे चौघेही अनुभवी पंच आहेत. या चौघांना या क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. त्यानुसारच या चौघांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान टीम : मोहम्मद रिजवान (कॅप्टन), सलमान अली आगा, बाबर आजम, फखर जमां, सऊद शकील, कामरान गुलाम, खुशदिल शाह, तैयब ताहिर, उस्मान खान, फहीम अशरफ, शाहीन शाह अफ्रिदी, हारिस राऊफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन आणि अबरार अहमद.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.