AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धा सुरु असताना चेन्नई सुपर किंग्सकडून नव्या खेळाडूचा शोध, मुंबईच्या अष्टपैलूची घेणार चाचणी

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी हवी तशी झालेली नाही. त्यात खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघाचं टेन्शन वाढलं आहे. या दरम्यान चेन्नई सुपर किंग्सने नव्या खेळाडूला ट्रायलसाठी बोलवलं होतं.

आयपीएल स्पर्धा सुरु असताना चेन्नई सुपर किंग्सकडून नव्या खेळाडूचा शोध, मुंबईच्या अष्टपैलूची घेणार चाचणी
आयपीएल स्पर्धा सुरु असताना चेन्नई सुपर किंग्सकडून नव्या खेळाडूचा शोध, मुंबईच्या अष्टपैलूची घेतली चाचणीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 27, 2026 | 7:21 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी हवी तशी झालेली नाही. चेन्नई सुपर किंग्सने आठ पैकी पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याचा आशा धूसर होत चालली आहे. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत राहायचं तर प्रत्येक सामना जिंकणं भाग आहे. अशा स्थितीत एक मजबूत संघ मैदानात उतरणं गरजेचं आहे. चेन्नई सुपर किंग्सची फलंदाजी चांगली होत आहे. मात्र गोलंदाजीत बऱ्याच उणीवा जाणवत आहेत. असं सर्व गणित असताना संघावर दुखापतीचा डोंगर कोसळला आहे. काही खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकले आहेत. स्टार विकेटकीपर फलंदाज एमएस धोनी देखील दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकलेला नाही. त्यात मैदानात उतरेल की नाही याबाबतही शंका आहे.

डेवॉल्ड ब्रेव्हिस साइट स्ट्रेनमधून बरा होऊन चेन्नई सुपर किंग्स संघात परतला. पण नाथन एलिस हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आऊट झाला आहे. स्पेंसर जॉनसनही बॅक स्ट्रेबस फ्रॅक्चरमुळे त्रस्त आहे. दुसरीकडे, आयुष म्हात्रे आणि खलील अहमद दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकले आहेत. त्यामुळे त्यांची जागा भरून काढण्याचं मोठं आव्हान चेन्नई सुपर किंग्स संघावर आहे. आयुष म्हात्रेची जागा आकाश मढवालने घेतली आहे. पण खलील अहमदची जागा काही अजून भरलेली नाही. त्यामुळे त्याची जागा भरून काढण्याचं आव्हान आहे. त्याच्या जागेसाठी चेन्नई सुपर किंग्सने 21 वर्षीय अष्टपैलू आयुष वर्तकला आयपीएल स्पर्धा सुरू असताना ट्रायलसाठी बोलवलं आहे.

रिपोर्टनुसार, आयुष वर्तक लवकरच चेन्नईला जाणार आहे. आयुष वर्तक मुंबई आणि पारसी जिमखान्यासाठी खेळतो. मध्यम गतीचा वेगवान गोलंदाज असून मधल्या फळीत चांगली गोलंदाजीही करतो. त्याच्या मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. आयुष वर्तकने मुंबई टी20 लीग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने 191 च्या स्ट्राईक रेटने 264 धावा केल्या होत्या. यात तीन विकेट घेतल्या होत्या. आयुष वर्तक मुंबई टी20 लीग स्पर्धेत नॉर्थ मुंबई पँथर्ससाठी खेळतो. तसेच मुंबई अंडर 19 क्रिकेट संघाचा भागही आहे.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है