CSK vs RCB Live Score, IPL 2022: अखेर चेन्नईची विजयाची प्रतिक्षा संपली, दुबे-रॉबिन उथाप्पा ठरले ‘हिरो’

chennai super kings vs royals challengers banglore in marathi: गुण तालिकेत सीएसकेचा संघ तळाला आहे. आरसीबीचा संघ 6 पॉईंटससह तिसऱ्या स्थानावर आहे.

CSK vs RCB Live Score, IPL 2022: अखेर चेन्नईची विजयाची प्रतिक्षा संपली, दुबे-रॉबिन उथाप्पा ठरले 'हिरो'
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर

|

Apr 12, 2022 | 11:56 PM

आयपीएलमध्ये अखेर आज चेन्नई सुपर किंग्सची पहिल्या विजयाची प्रतिक्षा संपली. CSK ने RCB वर 23 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताने चेन्नईने 216 धावा केल्या. RCB ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 193 धावा केल्या. चेन्नईने रांगेत चार पराभव पाहिल्यानंतर आज त्यांना विजय मिळाला. आधी KKR, PBKS, LSG आणि SRH कडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिवम दुबे आणि रॉबिन उथाप्पा चेन्नईच्या यंदाच्या सीजनमधल्या पहिल्या विजयाचे हिरो ठरले. शिवम दुबेने आज तुफान फटकेबाजी केली. त्याने 46 चेंडूत नाबाद 95 धावांची खेळी केली. यात पाच चौकार आणि आठ षटकार होते. रॉबिन उथाप्पा संकटमोचक ठरला. त्याने बिनधास्तपणे फटकेबाजी सुरु ठेवली. त्याने 50 चेंडूत 88 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि नऊ षटकार होते.

Key Events

CSK आणि RCB ची कामगिरी

डिफेंडिंग चॅम्पियन CSK चा KKR, PBKS, LSG आणि SRH कडून पराभव झाला आहे. RCB ला PBKS ने हरवलं होतं. त्यांनी KKR, RR आणि MI या संघांवर विजय मिळवला आहे.

मागच्या सामन्यातील रेकॉर्ड

मागच्या तीन सामन्यात RCB ने विजय मिळवला आहे, तर CSK ला सलग चार पराभवांना सामोर जावं लागलं आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 12 Apr 2022 11:28 PM (IST)

  अखेर चेन्नईची विजयाची प्रतिक्षा संपली, दुबे-रॉबिन उथाप्पा ठरले ‘हिरो’

  अखेर चेन्नई सुपर किंग्सची पहिल्या विजयाची प्रतिक्षा संपली आहे. CSK ने RCB वर 23 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताने चेन्नईने 216 धावा केल्या. RCB ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 193 धावा केल्या.

 • 12 Apr 2022 11:11 PM (IST)

  दिनेश कार्तिकची फटकेबाजी

  दिनेश कार्तिकची फटकेबाजी सुरु आहे. 12 चेंडूत त्याने 34 धावा केल्या आहेत. आठ बाद 169 धावा RCB च्या झाल्या आहेत. 18 चेंडूत 48 धावांची आवश्यकता आहे.

 • 12 Apr 2022 11:01 PM (IST)

  चेन्नई पहिल्या विजयाच्याजवळ, RCB च्या आठ विकेट

  RCB च्या आठ विकेट गेल्या आहेत. जाडेजाच्या गोलंदाजीवर आकाश दीपने भोपळाही न फोडता रायुडूकडे झेल दिला. आरसीबीच्या आठ बाद 146 धावा झाल्या आहेत.

 • 12 Apr 2022 10:56 PM (IST)

  आरसीबीच्या सात विकेट

  15.2 षटकात RCB च्या सातबाद 146 धावा झाल्या आहेत. शाहबाज अहमद 41, सुयश प्रभूदेसाई 34 धावांवर आऊट झाला. आता दिनेश कार्तिक मैदानात आहे.

 • 12 Apr 2022 10:06 PM (IST)

  RCB चा डाव गडगडला, ग्लेन मॅक्सवेल बोल्ड

  RCB चा डाव गडगडला आहे. ग्लेन मॅक्सवेल बोल्ड झाला. रवींद्र जाडेजाने त्याची विकेट काढली. सात षटकात आरसीबीची अवस्था चार बाद 50 धावा आहे.

 • 12 Apr 2022 10:03 PM (IST)

  महेश तीक्ष्णाचा भेदक मारा, RCB ची तिसरी विकेट

  RCB ची तिसरी विकेट गेली आहे. महेश तीक्ष्णाने अनुज रावतला 12 धावांवर पायचीत पकडलं. तीन बाद 42 अशी आरसीबीची स्थिती आहे.

 • 12 Apr 2022 09:54 PM (IST)

  विराट कोहली स्वस्तात आऊट

  फाफ डु प्लेसिस पाठोपाठ विराट कोहली स्वस्तात आऊट झाला. अवघ्या एक रन्सवर त्याला मुकेश चौधरीने शिवम दुबेकरवी झेलबाद केलं. आरसीबीच्या दोन बाद 26 धावा झाल्या आहेत.

 • 12 Apr 2022 09:47 PM (IST)

  कॅप्टन डु प्लेसिस स्वस्तात OUT

  RCB ला पहिला झटका बसला आहे. कॅप्टन डु प्लेसिस स्वस्तात OUT झाला आहे. महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर त्याने जॉर्डनकडे सोपा झेल दिला. डु प्लेसिस आठ धावांवर आऊट झाला. RCB च्या तीन षटकात एक बाद 14 धावा झाल्या आहेत.

 • 12 Apr 2022 09:43 PM (IST)

  आरसीबीच्या डावाला सुरुवात

  आरसीबीच्या डावाला सुरुवात झाली आहे. दोन षटकातच्या त्यांच्या बिनबाद 11 धावा झाल्या आहेत. फाफ डु प्लेसिस आणि अनुज रावत ही त्यांची सलामीची जोडी मैदानात आहे.

 • 12 Apr 2022 09:22 PM (IST)

  शिवम दुबे-रॉबिन उथाप्पाची स्फोटक खेळी

  शिवम दुबे आणि रॉबिन उथाप्पाने आज स्फोटक फलंदाजी केली. RCB ला विजयासाठी 216 धावांचं टार्गेट दिलं आहे. शिवम दुबेने 46 चेंडूत नाबाद 94 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि आठ षटकार होते. दुसऱ्याबाजूला उथाप्पाने 50 चेंडूत 89 धावांची खेळी केली. यात चार चौकार आणि नऊ षटकार होते.

 • 12 Apr 2022 09:07 PM (IST)

  आकाश दीपच्या चार ओव्हरमध्ये धावा लुटल्या

  18 वं षटक टाकणाऱ्या आकाश दीपच्या ओव्हरमध्ये शिवम दुबेने फटकेबाजी केली. चेन्नईच्या दोन बाद 187 धावा झाल्या आहेत. आकाश दीपने चार ओव्हरमध्ये तब्बल 58 धावा दिल्या.

 • 12 Apr 2022 09:00 PM (IST)

  शिवम दुबे-रॉबिन उथाप्पाची जबरदस्त फलंदाजी

  17 षटकात सीएसकेच्या दोन बाद 163 धावा झाल्या आहेत.

 • 12 Apr 2022 08:51 PM (IST)

  रॉबिन उथाप्पा-शिवम दुबेची फटकेबाजी

  रॉबिन उथाप्पा-शिवम दुबेची फटकेबाजी सुरु आहे. दोघांच्या हाफ सेंच्युरी झाल्या आहेत. 16 षटकात चेन्नईच्या दोन बाद 145 धावा झाल्या आहेत. शिवम दुबे नाबाद 53 आणि उथाप्पा 65 धावांवर खेळतोय.

 • 12 Apr 2022 08:21 PM (IST)

  शिवम दुबे-रॉबिन उथाप्पाची जोडी मैदानात

  10 षटकात चेन्नईच्या 60 धावा झाल्या आहेत. शिवम दुबे आणि रॉबिन उथाप्पाची जोडी मैदानात आहे.

 • 12 Apr 2022 08:05 PM (IST)

  चेन्नईला दुसरा झटका, मोईन अली Run out

  मोईन अली तीन धावांवर रनआऊट झाला आहे. प्रभूदेसाईने केलेल्या थ्रो वर कार्तिकने रनआऊट केलं. सात षटकात सीएसकेच्या दोन बाद 37 धावा झाल्या आहेत.

 • 12 Apr 2022 08:01 PM (IST)

  पावरप्लेची षटक संपली

  पावरप्लेच्या सहा षटकात चेन्नईच्या एक बाद 34 धावा झाल्या आहेत. आकाश दीपच्या पाचव्या चेंडूवर रॉबिन उथाप्पाने षटकार लगावला. उथाप्पा 14, मोईन अली तीन धावांवर खेळतोय.

 • 12 Apr 2022 07:56 PM (IST)

  उथाप्पा-सिराजची जोडी मैदानात

  पाच षटकात CSK च्या एक बाद 25 धावा झाल्या आहेत. उथाप्पा सात आणि मोईन अली एक रन्सवर खेळतोय. सिराजच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला.

 • 12 Apr 2022 07:50 PM (IST)

  ऋतुराज गायकवाड OUT

  ऋतुराज गायकवाडच्या रुपाने जोश हेझलवूडने सीएसकेला पहिला झटका दिला आहे. हेझलवडूने ऋतुराजला 17 धावांवर पायचीत पकडलं.

 • 12 Apr 2022 07:45 PM (IST)

  मोहम्मद सिराजला लगावला चौकार

  तीन षटकात सीएसकेच्या बिनबाद 15 धावा झाल्या आहेत. ऋतुराज गायकवाडने मोहम्मद सिराजला या ओव्हरमध्ये चौकार लगावला.

 • 12 Apr 2022 07:40 PM (IST)

  जोश हेझलवूडने टाकली ओव्हर

  दोन षटकात सीएसकेच्या बिनबाद 8 धावा झाल्या आहेत. जोश हेझलवूडने दुसरी ओव्हर टाकली.

 • 12 Apr 2022 07:35 PM (IST)

  चेन्नईच्या डावाला सुरुवात

  मोहम्मद सिराजने पहिलं षटक टाकलं आहे. चेन्नईच्या बिनबाद 6 धावा झाल्या आहेत. रॉबिन उथाप्पा आणि ऋतुराज गायकवाडची जोडी मैदानात आहे.

 • 12 Apr 2022 07:26 PM (IST)

  अशी आहे CSK ची Playing - 11

 • 12 Apr 2022 07:24 PM (IST)

  अशी आहे RCB ची Playing - 11

 • 12 Apr 2022 07:21 PM (IST)

  Raj Thackeray Speech LIVE : प्रकाश महाजनांची तुफान बॅटिंग

  पक्षप्रमुख हा एक शिवसैनिकच असतो..

  त्या पक्षप्रमुखाला पुढे केलं.

  त्याचं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीशी लग्न लावलं... आता हे पोरगं.. काल परवाचं.. अ

  जून याचे दुधाचे दात पडलेले नाहीत आणि हा निघाला राजा साहेबांसारख्या वाघाच्या जबड्यात हात टाकायला...

  अरे तुझं वय काय, तुझी औकात काय...

Published On - Apr 12,2022 7:19 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें