AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs PAK : पाकिस्तान आणि श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ची लढाई, अंतिम फेरीचं गणित असं

आशिया कप 2025 स्पर्धा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. सुपर 4 फेरीत टॉपला असलेल्या दोन संघांना अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. अशा स्थिती भारत श्रीलंका यांच्यात करो या मरोची स्थिती आहे.

SL vs PAK : पाकिस्तान आणि श्रीलंकेसाठी 'करो या मरो'ची लढाई, अंतिम फेरीचं गणित असं
SL vs PAK : पाकिस्तान आणि श्रीलंकेसाठी 'करो या मरो'ची लढाई, अंतिम फेरीचं गणित असं Image Credit source: ACC
| Updated on: Sep 22, 2025 | 8:46 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतून पत्ता कापला जाणार आहे. विजय मिळाल्यानंतर इतर संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागणार आहे. अशा स्थितीत हा सामना असल्याने दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असणार आहेत. हा 23 सप्टेंबरला अबू धाबी येथे होणार आहे. सुपर 4 फेरीत प्रत्येक संघाला एकूण 3 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 2 सामन्यात काहीही करून विजय मिळवणं भाग आहे. तसेच नेट रनरेटही महत्त्वाचा ठरणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी सुपर 4 फेरीतील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे आता हा सामना जिंकणं दोन्ही संघांना गरजेचा आहे. करो या मरोची स्थिती असलेल्या या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होणार आहे.

श्रीलंका आणि पाकिस्तान य महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी संघात बदल करणार यात काही शंका नाही. श्रीलंकेला मागच्या सामन्यात बांगलादेशकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. शेवटच्या षटकात श्रीलंकेचा तोंडातला घास बांगलादेशने हिरावून नेला होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मथिसा पथिराना किंवा महिश तीक्षणा यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकते. या दोघांपैकी एकाला दुनिथ वेलालागेच्या जागी संघात सहभागी केलं जाऊ शकतं. तर पाकिस्तान संघातही उलथापालथ होऊ शकते. साहिबजादा फरहान सोडला तर कोणीच चांगली फलंदाजी करू शकलं नाही. यामुळे फलंदाजीत काही बदल केले जाऊ शकता. हुसैन तलतला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पण कोणाला काढणार हे काही सांगता येत नाही.

श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कामिल मिश्रा, कुसल परेरा, चारिथ असलंका (कर्णधार), दासून शनाका, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, मथिसा पाथिराना/महिश थिक्षाना, दुष्मांता चमीरा, नुवान तुषारा.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.