AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी शतकं करणारे भारतीय, विराट रेकॉर्ड ब्रेक करण्यापासून किती दूर होता?

India vs England Test Series : टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान एकूण 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाची ही पहिलीच कसोटी मालिका आहे.

ENG vs IND : इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी शतकं करणारे भारतीय, विराट रेकॉर्ड ब्रेक करण्यापासून किती दूर होता?
Virat Kohli Team IndiaImage Credit source: Icc X account
| Updated on: Jun 13, 2025 | 3:15 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. कसोटी कर्णधार म्हणून शुबमन गिल याची ही पहिलीच मालिका असणार आहे. तसेच या मालिकेत अनेक रेकॉर्ड्स ब्रेक होऊ शकतात. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला या मालिकेत इंग्लंडमध्ये 50 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज होण्याची संधी आहे. तसेच इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट टीम इंडिया विरुद्ध 3 हजार धावांपासून फक्त 154 रन्स दूर आहे. टीम इंडियाचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याच्या महारेकॉर्ड जवळ कुणीही नाही. भारताकडून इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम हा सचिनच्या नावावर आहे. सचिनने इंग्लंडमध्ये 7 कसोटी शतकं झळकावली आहेत.

इंग्लंडमध्ये कसोटीत शतक करणं हे आव्हानात्मक असतं. सचिनने त्याच्या कारकीर्दीत 7 वेळा इंग्लंडमध्ये हा कारनामा केला होता. सचिनने 1990 साली नाबाद 119 धावांची खेळी केली होती. सचिनने त्याच्या शतकी खेळीसह क्रिकेट विश्वाला दखल घेण्यास भाग पाडलं होतं. तसेच सचिनने 2002 साली लीड्समध्ये 193 धावांची शानदार खेळी केली होती.

इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी शतकं करणारे फलंदाज

सचिननंतर इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ‘द वॉल’ अर्थात राहुल द्रविड आणि ‘लिटिल मास्टर’ सचिन तेंडुलकर संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत. द्रविड आणि गावसकर या दोघांनी प्रत्येकी 6-6 शतकं झळकावली आहेत.

विराट कोहली याने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटला अलविदा केला. विराटने इंग्लंडमध्ये 2 शतकं झळकावली आहेत. विराटने 2018 साली नॉटिंगघममध्ये 103 धावांची खेळी केली होती. विराटने या खेळीसह टीम इंडियाचा डाव सावरला होता. तर विराटने 2018 साली एजबस्टनमध्ये 149 धावा केल्या होत्या. तर रोहित शर्मा याला फक्त एकदाच इंग्लंडमध्ये शतक करता आलं होतं. रोहितने 2021 साली लंडनमधील ओव्हल येथे 127 रन्स केल्या होत्या.

सचिन तेंडुलकरचा 7 शतकांचा विक्रम मोडीत काढणं भारतीय फलंदाजासाठी आव्हानात्मक असणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात असलेला केएल राहुल हा सर्वात अनुभवी फलंदाज आहे. केएल राहुल याने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 2 शतकं केली आहेत. केएलसाठीही हा विक्रम मोडीत काढणं आव्हानात्मक असणार आहे.

2 अनऑफिशियल टेस्ट मॅच सीरिज ड्रॉ

दरम्यान इंग्लंड विरुद्ध इंडिया कसोटी मालिकेआधी इंडिया ए विरुद्ध इग्लंड लायन्स यांच्यात 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचची सीरिज पार पडली. ही मालिका 0-0 ने बरोबरीत राहिली. मात्र या मालिका करुण नायर याने द्विशतक, केएल राहुल याने शतक तर ध्रुव जुरेलने 2 अर्धशतकं झळकावली. त्यामुळे टीम इंडियाचा टेस्ट सीरिजआधी विश्वास दुणावला आहे. त्यामुळे टीम इंडिया कसोटी मालिकेची सुरुवात कशी करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.