AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : केएल राहुल, आता असं चालणार नाही! शतकी खेळीनंतरही अनुभवी फलंदाजाबाबत माजी खेळाडू म्हणाला…

Team India KL Rahul : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर केएल राहुल हा सध्याच्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे केएलवर भारतीय संघाची अनुभवी खेळाडू म्हणून एक जबाबदारी आहे. केएलने इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात शतक केलं होतं.

ENG vs IND :  केएल राहुल, आता असं चालणार नाही! शतकी खेळीनंतरही अनुभवी फलंदाजाबाबत माजी खेळाडू म्हणाला...
KL Rahul Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 30, 2025 | 12:47 AM
Share

भारतीय क्रिकेट संघ सध्या शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीनंर पहिल्या कसोटी मालिकेत इंग्लंड विरुद्ध 2 हात करत आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला सामना हा लीड्समध्ये खेळवण्यात आला. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने या सामन्यात संयमी शतक केलं. केएलला पहिल्या डावात अर्धशतकही करता आलं नाही. मात्र केएलन दुसर्‍या डावात शतक करुन सर्व उणीव भरुन काढली. केएलने दुसर्‍या डावात 137 धावांची खेळी केली. त्यामुळे आता केएलकडून दुसर्‍या सामन्यातही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येणार आहे.

दुसऱ्या कसोटीआधी भारताचा माजी खेळाडू संजय मांजरेकर याने केएलबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संजय मांजरेकरने ऋषभ पंत याचं उदाहरण देत केएलला स्वत:ची क्षमता जाणून घेऊन सातत्याने मोठी खेळी करावी, असं म्हटलं आहे.

संजय मांजरेकरने काय म्हटलं?

संजय मांजरेकरने स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात बोलताना ऋषभ पंत याच्या बॅटिंगचं कौतुक केलं. “ऋषभ पंत टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटिंगचा आनंद घेतो. जेव्हा एखादा फलंदाज सामन्यातील दोन्ही डावात शतक करतो तेव्हा त्याला मानसिक आणि शारिरीकरित्या कणखर असायला लागतं. पंतने पहिल्या डावात शतक केलं. पंतने 48 तासांनंतर आणखी एक शतकं केलं. ही मोठ्या खेळाडूची चिन्हं आहेत”, असं माजंरकरने म्हटलं.

मांजरेकरने पंतच्या क्षमतेचा उल्लेख करताना केएललाही तशी खेळी करण्याचा सल्ला दिला. “ऋषभ पंत व्यतिरिक्त टीममध्ये आणखी एक अनुभवी फलंदाज आहे. त्याच्याकडे या मालिकेत सातत्याने धावा करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नाही.भारतीय क्रिकेटला त्याची फार गरज आहे. त्यामुळे केएलला फक्त 1 शतक किंवा एका सामन्यात चांगली कामगिरी करणारा खेळाडू राहून जमणार नाही”, असंही मांजरेकरने नमूद केलं.

दरम्यान पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र गोलंदाजांनी निराशा केली. यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, शुबमन गिल आणि केएल राहुल या 4 फलंदाजांनी शतक केलं. आता गोलंदाजांवर दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी असणार आहे. आता भारतीय गोलंदाज दुसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.