AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : प्रसिध कृष्णा-मोहम्मद सिराजची कडक बॉलिंग, इंग्लंडचं 247 वर पॅकअप, फक्त 23 धावांची आघाडी

ENG vs IND 5Th Test : भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 51.2 ओव्हरमध्ये 247 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. भारतासाठी प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या दोघांनी इंग्लंडच्या प्रत्येकी 4-4 फलंदाजांना बाद केलं.

ENG vs IND : प्रसिध कृष्णा-मोहम्मद सिराजची कडक बॉलिंग, इंग्लंडचं 247 वर पॅकअप, फक्त 23 धावांची आघाडी
Mohammed Siraj and Prasidh Krishna Team IndiaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Aug 01, 2025 | 11:02 PM
Share

प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम बॉलिंग करत इंग्लंडला पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी 250 धावांच्या आत रोखत मोठी आघाडी घेण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. इंग्लंडने भारताला पहिल्या डावात 224 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर इंग्लंडने स्फोटक सुरुवात केली. मात्र त्यानंतर सिराज-प्रसिध जोडीने कमाल करत इंग्लंडच्या फलंदाजांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 247 धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात फक्त 23 धावांचीच आघाडी घेता आली. त्यामुळे आता भारतीय फलंदाज दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या करुन इंग्लंडसमोर डोंगराएवढं आव्हान ठेवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंग्लंडची बॅटिंग

टीम इंडियाला ऑलआऊट केल्यानंतर इंग्लंडच्या झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने विस्फोटक सुरुवात केली. या दोघांनी चौफेर फटकेबाजी करत इंग्लंडला 90 पार पोहचवलं. डकेट आणि क्रॉली या सलामी जोडीने भारताची डोकेदुखी वाढवली होती. मात्र आकाश दीप याने डकेटला आऊट करत इंग्लंडला 92 धावांवर पहिला झटका दिला. डकेट 38 बॉलमध्ये 43 रन्स करुन आऊट झाला.

त्यानंतर प्रसिध आणि सिराज जोडीने इंग्लंडच्या एकाही जोडीला फार वेळ टिकून दिलं नाही. दोघांनीही इंग्लंडला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे इंग्लंडला फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही.  भारताने इंग्लंडला 155 धावांच्या मोबदल्यात 9 झटके दिले.  इंग्लंडसाठी झॅक क्रॉली याने सर्वाधिक 64 धावा केल्या. तर हॅरी ब्रूकने 53 धावांचं योगदान दिलं. तसेच कर्णधार ओली पोप याने 22 तर जो रुट याने 29 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

टीम इंडियाची कडक बॉलिंग

सिराज-प्रसिधचा कहर

प्रसिध कृष्णा याने 16 ओव्हरमध्ये 3.90 च्या इकॉनॉमीने 62 धावा देत इंग्लंडच्या झॅक क्रॉली, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन आणि गस एटकीन्सन याला आऊट केलं. तर मोहम्मद सिराज याने 16.2 षटकांत 86 धावांच्या मोबदल्यात कॅप्टन ओली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक आणि जेकब बेथेल या चौघांना मैदानाबाहेर पाठवलं. तर आकाश दीप याने एकमेव विकेट घेत दोघांना चांगली साथ दिली.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.