ENG vs IND : बुमराह केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळणार की नाही? कॅप्टन शुबमन म्हणाला…
Shubman Gill ENG vs IND 5th Test Press Conference : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना 31 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार शुबमन गिल याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट दिलीय.

भारतीय संघाने शानदार कामगिरी करत चौथा कसोटी सामना यशस्वीरित्या बरोबरीत सोडवला आणि इंग्लंडला विजयापासून दूर ठेवलं. मात्र त्यानंतरही इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी पाचवा आणि अंतिम कसोटी सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. भारताला मालिका बरोबरीत राखण्यासाठी पाचवा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे भारताची या सामन्यात करो या मरो अशी स्थिती आहे. हा सामना 31 जुलैपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार शुबमन गिल याने पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य केलं. शुबमनने जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीत खेळणार की नाही? याबाबत अपडेट दिली. तसेच फिरकीपटूंबाबतही प्रतिक्रिया दिली. तसेच शुबमनने ओव्हलमधील खेळपट्टीबाबतही माहिती दिली.
बुमराह खेळणार की नाही?
बुमराह पाचव्या कसोटीत खेळणार की नाही? शुबमनने या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर दिलं नाही. “आम्ही अर्शदीप सिंह याला तयार राहण्यासाठी सांगितलं आहे. तसेच प्लेइंग ईलेव्हनचा निर्णय हे खेळपट्टी पाहून घेतला जाईल. तसेच बुमराहबाबतचा अंतिम निर्णय हा सामन्याआधीच घेतला जाईल”, असं शुबमनने म्हटलं.
कुलदीप यादव खेळणार की नाही?
तसेच शुबमनने पाचव्या कसोटीत कुलदीप यादव खेळणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं. इंग्लंडने पाचव्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केलीय. इंग्लंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकही फिरकीपटू नाही. “शुबमनने याबाबत प्रतिक्रिया दिली. इंग्लंडने एकाही फिरकीपटूला संधी दिली नाही. मात्र आमच्याकडे रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर आहेत”, असं शुबमन म्हणाला.
“ओव्हरमधील खेळपट्टी हिरवीगार आहे.अर्थात त्या खेळपट्टीवर गवत आहे. त्यामुळे ओव्हलमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल”, असं शुबमनने ओव्हलमधील खेळपट्टीबाबत म्हटलं.
शुबमन गिल काय म्हणाला?
#WATCH | London, UK | On the heated conversation between Indian Cricket Team Head Coach Gautam Gambhir and Oval Pitch Curator Lee Fortis, Indian Team Captain Shubman Gill says, “I don’t know what exactly happened yesterday and why the pitch curator did what he did. We have played… pic.twitter.com/rn01pvHOwQ
— ANI (@ANI) July 30, 2025
इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन
दरम्यान इंग्लंडने पाचव्या सामन्याच्या 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल केले आहेत. कर्णधार बेन स्टोक्स याला खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. त्या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि ब्रायडन कार्स या तिघांना बाहेर करण्यात आलं आहे. तर जेकब बेथेल, गस एटकीन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग या चौघांना संधी देण्यात आली आहे.
