AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs SA | दक्षिण आफ्रिकाचा धमाकेदार विजय, इंग्लंडचा 229 धावांनी धुव्वा

England vs South Africa Icc World Cup 2023 | दक्षिण आफ्रिकाने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये इंग्लंड विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड कपमध्ये मोठा विजय ठरला.

ENG vs SA | दक्षिण आफ्रिकाचा धमाकेदार विजय, इंग्लंडचा 229 धावांनी धुव्वा
| Updated on: Oct 21, 2023 | 9:07 PM
Share

मुंबई | दक्षिण आफ्रिका टीमने इतिहास रचला आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका टीमने इंग्लंडवर 229 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला विजयासाठी 400 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगसमोर इंग्लंडचे फलंदाज फुस्स ठरले. इंग्लंडला 22 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 170 धावाच करता आल्या. तर रीस टोपली याला दुखापत झाल्याने तो खेळायला येऊ शकला नाही. इंग्लंडचा वनडे क्रिकेटमधील हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.  दक्षिण आफ्रिका टीमला या मोठ्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये तगडा फायदा झाला आहे.

इंग्लंडकडून मार्क वूड याने सर्वाधिक नाबाद 43 धावा केल्या. तर गस ऍटकिन्सन याने 35 धावांचं योगदान दिलं. या जोडीने नवव्या विकेटसाठी तोडफोड बॅटिंग करत 70 धावांची भागीदारी केली. या दोघांनी अखेरीस केलेल्या भागीदारीमुळे विजयातील अंतर हे आणखी कमी होण्यास मदत झाली. अन्यथा दक्षिण आफ्रिकेला नेट रनरेटमध्ये आणखी फायदा झाला असता.

वूड आणि ऍटकिन्सन या दोघांशिवाय टॉप, मिडल आणि लोअर ऑर्डरमधील कुणालाच विशेष काही करता आलं नाही. तिघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. जो रुट 2, बेन स्टोक्स 5 आणि डेव्हिड मलान 6 धावांवर आऊट झाले. तर हॅरी ब्रूक 17, जॉस बटलर 15 आणि याने डेव्हिड व्हिली 12 धावांचं योगदान दिलं. तर जॉनी बेयरस्टो आणि आदिल रशिद या दोघांनी प्रत्येकी 10 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकाकडून गेराल्ड कोएत्झी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. लुंगी एन्गिडी आणि मार्को जान्सेन या जोडीने प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कगिसो रबाडा आणि केशव महाराज या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि रीस टोपले.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.