AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs SA Semi Final Live Streaming : इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

England vs South Africa Semi Final Womens World Cup 2025 Live Match Score : वनडे वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ बुधवारी 29 ऑक्टोबरला निश्चित होणार आहे. फायनलमध्ये पोहचण्यासाठी इंग्लंड-दक्षिण आफ्रिका यांच्याच चुरस असणार आहे.

ENG vs SA Semi Final Live Streaming : इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ENG vs SA Women Semi Final Live StreamingImage Credit source: Icc X Account
| Updated on: Oct 28, 2025 | 9:28 PM
Share

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यजमान टीम इंडियानेही सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना या फेरीची आणखी प्रतिक्षा आहे. या फेरीतील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनसेामने असणार आहे. लॉरा वॉल्वार्ट ही दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट हीच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. उपांत्य फेरीतील या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बुधवारी 29 ऑक्टोबरला होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळणार आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये पोहचणार?

दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत एकदाही वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचता आलेलं नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे यंदा गेल्या अनेक दशकांची प्रतिक्षा संपवण्याची सुवर्णसंधी आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडने गेल्या 2 वर्ल्ड कप स्पर्धेत सलग अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत इंग्लंडकडे सेमी फायनलमध्ये खेळण्याचा अधिक अनुभव आहे.

तसेच इंग्लंडने या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. त्यामुळे एकूणच पाहता सर्वच बाबतीत इंग्लंडचा दबदबा पाहायला मिळत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं आव्हान आहे. आता दक्षिण आफ्रिका हे आव्हान पेलत फायनलचं तिकीट मिळवणार की इंग्लंड पुन्हा आणि सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचणार? यासाठी चाहत्यांना सामन्याच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.