ENG vs SL : इंग्लंड 358वर ऑलआऊट, श्रीलंके विरुद्ध 122 धावांची आघाडी, जेमी स्मिथची शतकी खेळी
England vs Sri Lanka, 1st Test Day 3: इंग्लंडचा पहिला डाव हा 358 धावांवर आटोपला आहे. इंग्लंडने यासह श्रीलंके विरुद्ध 122 धावांची आघाडी घेतली आहे.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीतील आजचा (23 ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 122 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडने श्रीलंकेच्या 236 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या डावात ऑलआऊट 85.3 ओव्हरमध्ये 358 धावा केल्या. इंग्लंडसाठी जेमी स्मिथ याने सर्वाधिक धावा केल्या. जेमीने 111 धावांची खेळी केली. तर श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आता श्रीलंकेचा दुसऱ्या डावात या 122 धावांचा यशस्वी पाठलाग करुन मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. तर इंग्लंड श्रीलंकेला झटपट गुंडाळण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
इंग्लंडच्या तिसऱ्या दिवशी 99 धावा
इंग्लंडला तिसऱ्या दिवशी 4 विकेट्सच्या मोबदल्यात 99 धावाच करता आल्या. इंग्लंडने दुसऱ्या दिवसापर्यंत 4.25 च्या रन रेटने 61 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 259 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जेमी स्मिथ याचा अपवाद वगळता इतर कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. जेमीने केलेल्या शतकी खेळीमुळेच इंग्लंडला 100 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेता आली.
इंग्लंडकडून हॅरी ब्रूक याने 73 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. जो रुट याने 42, डॅनियल लॉरेन्स 30, ख्रिस वोक्स 25, मार्क वूड 22, गस ऍटकिन्सनने 20, बेन डकेट 18 आणि मॅथ्यू पॉट्स याने 17 धावांची खेळी केली. तर कॅप्टन ओली पोप याने 6 तर शोएब बशीरने नाबाद 3 धावा केल्या. श्रीलंकेकडून असिथा व्यतिरिक्त प्रभात जयसूर्या याने 3 विकेट्स घेतल्या. विश्वा फर्नांडोने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर डेब्यूटंट मिलन रथनायके याने गस ऍटकिन्सन याला आऊट करत कसोटी कारकीर्दीतील पहिली विकेट घेतली.
इंग्लंडकडे 122 धावांची आघाडी
England have managed to gain a sizable lead in the first innings.#WTC25 | #ENGvSL 📝: https://t.co/2ADxtW1vwH pic.twitter.com/DN3ZLu2OwD
— ICC (@ICC) August 23, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो आणि मिलन रथनायके.
