AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : इंग्लंडला ऑस्ट्रेलियाच्या महारेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी, टीम इंडियाही शर्यतीत

Test Cricket : इंग्लंडसह टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. तसेच दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने विंडीज विरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सलामी देत आपला वर्ल्ड रेकॉर्ड आणखी मजबूत केला आहे. त्यामुळे या 3 संघांमध्ये वर्ल्ड रेकॉर्डसाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.

ENG vs IND : इंग्लंडला ऑस्ट्रेलियाच्या महारेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी, टीम इंडियाही शर्यतीत
Ravindra Jadeja Team IndiaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 28, 2025 | 11:50 PM
Share

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीची आठवड्याभराआधी सुरुवात झाली आहेत. टीम इंडिया आणि इंग्लंड दोन्ही संघांनी या साखळीतील पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळला. भारताला या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने लीड्समध्ये झालेल्या या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. आता उभयसंघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा 2 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडला दुसरा सामना जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. इंग्लंडला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे.

नक्की रेकॉर्ड काय?

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप या स्पर्धेला 2019 पासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. मात्र इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या या विक्रमाच्या मागे हात धुवून लागली आहे. इंग्लंड टीम इंडियावर मात केल्यानंतर डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघाच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहचली आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर पहिल्या कसोटीत मात करत आपला विक्रम आणखी भक्कम केला आहे. ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी स्पर्धेत आतापर्यंत 55 पैकी 34 सामने जिंकले आहेत.

इंग्लंडला बर्मिंगहॅममध्ये बरोबरीची संधी

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा बर्मिंगहॅममधील एजबेस्टनमध्ये येथे होणार आहे. इंग्लंडला हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे. इंग्लंडने या स्पर्धेत आतापर्यंत 66 पैकी 33 सामने जिंकले आहेत. तर यादीत टीम इंडिया तिसर्‍या स्थानी आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 57 पैकी 31 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर चौथ्या क्रमांकावर गतविजेता दक्षिण आफ्रिका विराजमान आहे. दक्षिण आफ्रिकेने 41 पैकी 22 सामने जिंकले आहेत.

WTC स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणारे संघ

  1. ऑस्ट्रेलिया : 55 सामने, 34 विजय
  2. इंग्लंड : 66 सामने, 33 विजय
  3. टीम इंडिया : 57 सामने, 31 विजय
  4. दक्षिण आफ्रिका : 41 सामने, 22 विजय

टीम इंडियालाही संधी

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेतील आणखी 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्ल्ड रेकॉर्डसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाला विंडीज विरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे दोन्ही मालिका संपल्यानंतर कोणता संघ पहिल्या स्थानी असणार? याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असेल.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.