Icc World Cup 2023 आधी टीमचा कॅप्टन बदलला, आता या खेळाडूकडे जबाबदारी
New Captain | वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी असताना टीम मॅनेजमेंटने एकाएकी कॅप्टन बदलल्याने क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगली आहे. नक्की कोण कॅप्टन झालाय जाणून घ्या.

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. त्यात वर्ल्ड कप भारतात होत असल्याने क्रिकेट चाहत्यांसाठी दूधात साखर पडल्यासारखंच झालंय. आयसीसी वनडे वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण 10 संघ या स्पर्धेत भिडणार आहेत. त्यापैकी 5 संघांनी टीम जाहीर केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि टीम इंडियाचा समावेश आहे. या वर्ल्ड कपआधी टीम इंडिया आशिया कपमध्ये खेळतेय. आशिया कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कपआधी इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यातही 3 सामन्यांची वनडे सीरिज होणार आहे. आयर्लंड या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. उभयसंघात 20 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर दरम्यान ही मालिका पार पडणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बुधवारी 13 सदस्यीय संघ जाहीर केला. इंग्लंड आणि आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
झॅक क्रॉली हा आयर्लंड विरुद्ध इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. झॅक पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळणार आहे. तर बेन डकेट याला उपकर्णधारपदाची जबाबादारी देण्यात आली आहे. इंग्लंड टीममध्ये 3 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सॅम हेन, विकेटकीपर बॅट्समन जेमी स्मिथ आणि जॉर्ज स्क्रिमशॉ आहेत.
आयर्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम जाहीर
Zak Crawley captain ✅
Find out who else has been included in our 13-player squad to face Ireland 👇#EnglandCricket | #ENGvNZ
— England Cricket (@englandcricket) September 6, 2023
एकदिवसीय मालिकेबाबत थोडक्यात
या एकदिवसीय मालिकेला 20 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. दुसरा सामना हा 23 सप्टेंबरला होणार आहे. तर 26 सप्टेंबरला तिसऱ्या आणि अंतिम सामना होणार आहे. या सामन्याने मालिकेची सांगता होणार आहे.
इंग्लंड क्रिकेट टीम | झॅक क्रॉली (कॅप्टन), हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्से, बेन डकेट (उपकर्णधार), सॅम हॅन, विल जॅक्स, रेहान अहमद, क्रेग ओवरटन, मॅथ्यू पॉट्स, फिल साल्ट, ल्यूक वुड, जॉर्ज स्क्रिमशॉ आणि जेमी स्मिथ.
इंग्लंड विरुद्ध आयर्लंड वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार 20 सप्टेंबर, हेडिंग्ले लीड्स.
दुसरा सामना, शनिवार 23 सप्टेंबर, ट्रेन्ट ब्रीज.
तिसरा सामना, मंगळवार 26 सप्टेंबर, ब्रिस्टॉल.
