AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : इंग्लंडं-इंडिया तिसर्‍या सामन्यातून कॅप्टन दुखापतीमुळे आऊट, या खेळाडूचा समावेश

England vs India 3rd T20i : वूमन्स इंग्लंड विरुद्ध वूमन्स टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे.

ENG vs IND : इंग्लंडं-इंडिया तिसर्‍या सामन्यातून कॅप्टन दुखापतीमुळे आऊट, या खेळाडूचा समावेश
Indian Cricket Team FacebookImage Credit source: Indian Cricket Team Facebook
| Updated on: Jul 04, 2025 | 1:06 AM
Share

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील 3 संघांमध्ये व्हाईट आणि रेड बॉलचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवयाला मिळत आहे. अंडर 19, वूमन्स आणि मेन्स टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहेत. मेन्स टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तर अंडर 19 टीम इंडिया 5 मॅचच्या यूथ वनडे सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. तर हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सलग 2 सामने जिंकले आहेत. भारताने यासह 2-0 अशा फरकाने आघाडी घेत मालिका विजयाचा दावा मजबूत केला आहे. अशात आता मोठी बातमी समोर आली आहे. कर्णधाराला दुखापतीमुळे आगामी सामन्याला मुकावं लागणार आहे.

इंग्लंड वूमन्स टीमची कॅप्टन आणि ऑलराउंडर नॅट सायव्हर-ब्रंट हीला दुखापतीमुळे तिसऱ्या टी 20i सामन्याला मुकणार आहे.  त्यामुळे इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. इंग्लंड आधीच मालिकेत पिछाडीवर आहे. त्यात कॅप्टन तिसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याने इंग्लंडच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. नॅटला डाव्या मांडीला दुखापत झाल्यामुळे तिसऱ्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. याबाबतची माहिती आयसीसीनं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.

नॅट मालिकेला मुकणार?

नॅटला गुरुवारी 3 जुलै रोजी दुखापत झाल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली. त्यामुळे नॅट तिसर्‍या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच तिला उर्वरित 2 सामन्यात खेळता येणार की नाही? याबाबतचा निर्णय मेडीकल रिपोर्ट आल्यानंतरच घेतला जाणार आहे. त्यामुळे नॅटला संपूर्ण मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्यास इंग्लंडसाठी तो मोठा झटका असेल.

तिसऱ्या सामन्यात कॅप्टन कोण?

नॅटच्या अनुपस्थितीत टीम इंडिया विरूद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यात टॅमी ब्यूमोंट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर तिसऱ्या सामन्यासाठी नॅटच्या जागी Maia Bouchie हीचा समावेश करण्यात आला आहे.

मालिकेत बॅकफुटवर असलेल्या इंग्लंडला मोठा झटका

तिसरा सामना केव्हा?

दरम्यान उभयसंघातील तिसरा सामना हा शुक्रवारी 4 जुलै रोजी केनिंग्टन ओवल, लंडनमध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. भारताकडे हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.