Test Cricket : कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, या खेळाडूची 2 वर्षानंतर एन्ट्री, कॅप्टन कोण?
Cricket News : आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट बोर्डाने कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. जाणून घ्या कुणाला संधी मिळाली?

टीम इंडिया आयपीएलच्या 18 व्या मोसमानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने झिंबाब्वे विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. बेन स्टोक्स याचं दुखापतीनंतर कमबॅक झालं आहे. बेन स्टोक्स या सामनात इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. हा सामना 22 मे रोजी होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे नॉटिंगघममधील ट्रेन्ट ब्रिज स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
सॅम कुक याला पदार्पणाची संधी
निवड समितीने झिंबाब्वे विरूद्धच्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज सॅम कुक याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. कुकने गेल्या काही वर्षात काउंटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच कुकने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 19.85 च्या सरासरीने 321 विकेट्सही घेतल्आ आहेत. कुकने गेल्या 5 हंगामात एसेक्ससाठी 227 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.तसेच जवळपास 2 वर्षांनंतर जोश टंग याचं इंग्लंड संघात कमॅबक झालं आहे. टंगने इंग्लंडसाठी जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजमध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता.
इंग्लंडने या व्यतिरिक्त टीममध्ये फर बदल केलेले नाहीत. झॅक क्रॉली आणि बेन डकेट ही जोडी ओपनिंग करेल. ओली पोप तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी येईल. जो रुट, हॅकी ब्रूक आणि कॅप्टन बेन स्टोक्स या तिघांवर मिडल ऑर्डरची जबाबदारी असणार आहे. जेमी स्मिथ विकेटकीपिंग करणार आहे. तसेच जोश टंग, गस एटकिंसन आणि सॅम कुक या त्रिकुटावर वेगवान गोलंदाजाची जबाबदारी असेल.
4 दिवसांचा कसोटी सामना
दरम्यान इंग्लंड विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात तब्बल 22 वर्षांनंतर कसोटी सामना होणार आहे. याआधी उभयसंघात जून 2003 साली अखेरचा कसोटी सामना खेळवण्यात आला होता. तेव्हा इंग्लंडने झिंबाब्वेवर डाव आणि 69 धावांनी मात केली होती.
एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंडकडून प्लेइंग ईलेव्हन जाहीर
England name a debutant in their XI for the one-off Test against Zimbabwe, starting 22 May 👀
— ICC (@ICC) May 20, 2025
झिंबाब्वे विरूद्धच्या एकमेव कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कॅप्टन), जेमी स्मिथ (विकेटकीपर), गस एटकिंसन, जोश टंग, सॅम कुक आणि शोएब बशीर.
