IPL 2022 हार्दीक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये नसणार?, लिलावासंबधी नव्या नियमांनंतर समोर आली माहिती

सर्वाधिक म्हणजे 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी यंदाची आयपीएल (IPL 2021) खास ठरली नाही. त्यांना प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आलं नाही. त्यामुळे पुढील वर्षी संघ कशी रणनीती आखणार हे पाहावं लागेलं.

IPL 2022 हार्दीक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये नसणार?, लिलावासंबधी नव्या नियमांनंतर समोर आली माहिती
हार्दीक पंड्या

मुंबई: मागील काही काळापासून ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) खास कामगिरी करत नसल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी एकट्याच्या जीवावर सामना जिंकवणारा हार्दीक अलीकडे मात्र आऊट ऑफ फॉर्म असल्याचं दिसतं आहे. त्यात तो गोलंदाजीही करत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात आगामी आयपीएलच्या (IPL 2022) लिलावासंबधी नवी माहिती समोर आली असून सध्या आयपीएल खेळणारे संघ केवळ 4 खेळाडूंनाच रिटेन अर्थात संघात कायम ठेवू शकणार आहेत. त्यानुसार मुंबईचा संघ हार्दीकचा फॉर्म पाहता त्याला रिटेन करेल अशी शक्यता फार कमी आहे.

आयपीएलशी संबधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटलं की, ‘मला वाटतं नव्या नियमांनुसार चार खेळाडू जे संघ रिटेन करु शकतो. त्यात कर्णधार रोहित शर्मा असणार यात शंका नाही. तो गोलंदाजीचा प्रमुख म्हणून बुमराहला नक्कीच घेईल.’ दरम्यान सध्याच्या परिस्थितीनुसार ऑलराऊंडर म्हणूनही हार्दीक पेक्षा पोलार्डला जास्त पसंती असल्याचं दिसून येत आहे. तसंच चौथा खेळाडू म्हणून एक मुख्य फलंदाज जी जागा सूर्यकुमार आणि इशान किशन या दोघांमधील एकाला मिळू शकते. त्यामुळे हार्दीकला रिटेन करण्यात अडचण येईल. अर्थात लिलावात हार्दीकला मुंबई संघात घेण्यासाठी सर्वच प्रयत्न करेल यात शंका नाही.

लिलिवासंबधी नवे नियम काय?

नव्याने समोर आलेल्या नियमांनुसार आधीपासून आयपीएलमध्ये खेळत असलेले 8 संघ हे त्यांचे 4 जुने खेळाडू रिटेन करु शकतात. अर्थात संघात कायम ठेवू शकतात. असे करुन उरलेल्या खेळाडूंपैकी प्रत्येकी 3 खेळाडू हे नव्याने सामिल झालेले लखनौ आणि अहमदाबाद हे संघ आपल्या ताफ्यात घेऊ शकणार आहेत. आगामी लिलावाची तारीख जाहीर झाली नसली तरी यंदा संघाना 90 कोटी रुपये घेऊन खेळाडू विकत घेता येणार आहेत. मागील वर्षी ही किंमत 85 कोटी इतकी होती. या नव्याने जाहीर केलेल्या नियमांनुसार आयपीएलमध्ये सध्या खेळत असलेले 8 संघ हे संघात ठेवणाऱ्या खेळाडूंमध्ये 4 खेळाडूंपैकी 3 भारतीय 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी असंही संयोजन वापरु शकतात. तर नव्या संघासाठी 3 पैकी 2 भारतीय आणि 1 परदेशी खेळाडू घेण्याचा नियम करण्यात आला आहे.

इतर बातम्या

T20 World Cup 2021 च्या सामन्यांत अवघ्या 5 सेंकदातच कळतं कोण जिंकणार?, भारतीय संघाच न्यूझीलंड विरुद्ध काय होणार?

T20 World Cup 2021 मध्ये ‘या’ गोलंदाजांचा जलवा, भारताचे शेजारी करत आहेत धमाल!

India vs pakistan: ‘सामन्यानंतर विराटने पाकिस्तानच्या खेळाडूंना मिठी मारली, म्हणून त्यालाही अटक करणार का?,’ ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा सवाल

(For IPL 2022 new IPL Retention Rules comes after it mumbai indians may not retain hardik pandya for ipl 2022)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI