India vs New zealand: भारत वि. न्यूझीलंड सामन्यात हार्दीक करणार धमाका, बीसीसीआने पोस्ट केले खास PHOTO

पाकिस्तानकडून दारुण पराभूत झाल्यानंतर आता भारताचा टी20 विश्वचषकातील पुढील सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध असणार आहे. या सामन्यात स्टार ऑलराऊंडर हार्दीक पंड्या गोलंदाजी करणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

1/5
भारतीय संघाला टी20 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. यावेळी एका सहाव्या गोलंदाजाची कमी भारताला अगदी प्रकर्षाने जाणवली. दरम्यान संघात ही जबाबदारी असणारा हार्दीक गोलंदाजी न करु शकल्याने अशी परिस्थिती आली होती. पण आता समोर येणाऱ्या माहितीनुसार हार्दीक न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे.

2/5
हार्दीक गोलंदाजी करेल असे वाटण्यामागील कारण म्हणजे बीसीसीआयने स्वत: ट्विट करत याबाबतचा सूचक इशारा दिला आहे. त्यांनी हार्दीकचे काही सरावादरम्यानचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात तो गोलंदाजी करताना दिसत आहे.

3/5
हार्दीक पंड्याला गोलंदाजी करताना कमरेत त्रास होत होता. पण आता समोर येणाऱ्या माहितीनुसार सरावादरम्यान गोलंदाजी करताना त्याला हा त्रास होत नसल्याने तो आगामी सामन्यात नक्कीच गोलंदाजी करु शकेल.

4/5
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या फोटोत हार्दीक गोलंदाजीसह फलंदाजीही करत आहे. त्यामुळे पाकविरुद्ध मोठी धावसंख्या न करु शकलेला पंड्या न्यूझीलंडविरुद्ध चांगली फलंदाजी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

5/5
भारत आणि न्यूझीलंड हा सामना रविवारी अर्थात 31 ऑक्टोबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता नाणेफेक होणार आहे. या सामन्यात हार्दीक गोलंदाजी करुन सहाव्या गोलंदाजाची कमी भरुन काढतो का? याच्याकडे  सर्वांचे लक्ष असेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI