Glenn Maxwell: ‘त्या भारतीय फलंदाजाला विकत घेण्याइतके आमच्याकडे पैसे नाहीत’, मॅक्सवेलच मोठं विधान

ऑस्ट्रेलियाला ज्याला विकत घेणं परवडणार नाही, तो भारतीय फलंदाज कोण?

Glenn Maxwell: 'त्या भारतीय फलंदाजाला विकत घेण्याइतके आमच्याकडे पैसे नाहीत', मॅक्सवेलच मोठं विधान
Glen-MaxwellImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 6:27 PM

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवबद्दल एक मोठं विधान केलय. सूर्यकुमार यादव सारख्या फलंदाजाला बिग बॅश लीगमध्ये विकत घेणं शक्य नाहीय. सूर्यकुमार यादवला बिग बॅश लीगमध्ये खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडतील, असं मॅक्सवेलने म्हटलय.

त्याला खरेदी करण्यासाठी आमच्याकडे तितके पैसे नाहीत

ग्लेन मॅक्सवेलने ‘द ग्रेड क्रिकेटर’ दिलेल्या मुलाखतीत सूर्यकुमार यादवबद्दल हे विधान केलय. भविष्यात सूर्यकुमार यादव बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसेल का? असा प्रश्न ग्लेन मॅक्सवेलला विचारण्यात आला. त्यावर मॅक्सवेल म्हणाला की, “आमच्याकडचे पैसे कमी पडतील. सूर्यकुमार यादवला विकत घेणं शक्य नाहीय”

त्याला बॉलिंग करणं गोलंदाजासाठी चॅलेंज

सूर्यकुमार यादव यावर्षी टीम इंडियासाठी टी 20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडतोय. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 31 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1164 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि नऊ अर्धशतकं आहेत. सूर्यकुमार आयसीसीच्या टी 20 रँकिंगमध्ये क्रिकेट विश्वातील नंबर 1 फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवला गोलंदाजी करणं कुठल्याही गोलंदाजासाठी आव्हानात्मक आहे.

त्याला टीम इंडिया बाहेर करणं कठीण

सूर्यकुमार यादव सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तो फिट असेल, तर त्याला टीम इंडिया बाहेर केलं जाऊ शकत नाही. सूर्यकुमार यादव प्रत्येक सीरीजमध्ये एक नवीन रेकॉर्ड रचतोय. न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा फटकावल्या. सूर्यकुमारने या सीरीजमध्ये 31 रेटिंग पॉइंट कमावले. 890 रेटिंग पॉइंटस पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान दुसऱ्या स्थानावर आहे. मोहम्मद रिजवान सूर्यकुमारपेक्षा 54 पॉइंट्सनी मागे आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....