AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs LSG IPL 2022: राशिदने अप्रतिम गुगलीवर कृणालला क्रीझ बाहेर आणलं, आणि…. Must Watch Video

GT vs LSG IPL 2022: आजचा सामना जिंकणारा संघ सर्वप्रमथ प्लेऑफमध्ये दाखल होणार आहे. कारण दोन्ही संघांचे समान 16 गुण आहे. दोन्ही टीम्सनी आठ विजय मिळवलेत. ही दोन अव्वल संघांमधली लढाई आहे.

GT vs LSG IPL 2022: राशिदने अप्रतिम गुगलीवर कृणालला क्रीझ बाहेर आणलं, आणि.... Must Watch Video
gt vs lsg Image Credit source: IPL
| Updated on: May 10, 2022 | 10:37 PM
Share

मुंबई: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik pandya) आज टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी आज जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन गुजरात टायटन्सला 144 धावांवर रोखलं. केएल राहुलच्या (KL Rahul) लखनौला विजयासाठी 145 धावांची आवश्यकता आहे. लखनौची इनिंग सुरु होण्याआधी ते हे लक्ष्य सहज गाठतील असं वाटलं होतं. पण गुजरातच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. पावरप्ले पूर्ण होण्याआधीच लखनौचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. क्विंटन डि कॉकला (11) धावांवर यश दयालने, केएल राहुलला (8) मोहम्मद शमीने तर करण शर्माला (4) पुन्हा यश दयालने आऊट केलं.

तो गुगली इथे क्लिक करुन एकदा पहाच

त्यानंतर कृणाल पंड्यावर जबाबदारी होती. पण राशिद खानने आज अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने कृणाला पंड्याला अप्रतिम गुगलीवर खेळण्यासाठी क्रीझ बाहेर आणलं. कृणालची पावलं क्रीझ बाहेर जाताच विकेटकीपर सहाने कुठलीही चूक केली नाही. त्याने लगेच स्टम्पिंग केलं. कृणालने फक्त 5 धावा केल्या. 10 षटकात लखनौच्या चार बाद 58 धावा झाल्या आहेत. गुजरातचं लक्ष्य छोट असलं, तरी ते पार करणं सोप नाहीय. हे यावरुन स्पष्ट होतय.

आज जिंकेल तो प्लेऑफमध्ये जाणार

आजचा सामना जिंकणारा संघ सर्वप्रमथ प्लेऑफमध्ये दाखल होणार आहे. कारण दोन्ही संघांचे समान 16 गुण आहे. दोन्ही टीम्सनी आठ विजय मिळवलेत. ही दोन अव्वल संघांमधली लढाई आहे.

दरम्यान शुमभन गिलचं अर्धशतक आणि राहुल तेवतियाने अखेरीस केलेल्या फलंदाजीच्या बळावर गुजरातला 144 पर्यंत पोहोचता आला. सलामीवीर शुभमन गिलने 49 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. यात सात चौकार होते. तेवतियाने 16 चेंडूत चार चौकारांसह 22 धावा केल्या. लखनौच्या गोलंदाजांनी आज सुपर कामगिरी केली. खासकरुन आवेश आणि मोहसीन खानने भेदक मारा केला. आवेश खानने मॅथ्यू वेड आणि हार्दिक पंड्या हे दोन महत्त्वाचे विकेटस मिळवले. डेविड मिलरने 24 चेंडूत 26 धावा केल्या. यात फक्त एक चौकार आणि एक षटकार होता.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.