GT vs RR, IPL 2022 Final Live Updates : राजस्थान विरुद्ध गुजरात फायनलमध्ये भिडणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या खास गोष्टी

GT vs RR IPL 2022 Live Updates :

GT vs RR, IPL 2022 Final Live Updates : राजस्थान विरुद्ध गुजरात फायनलमध्ये भिडणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या खास गोष्टी
आयपीएल फायनल
Image Credit source: social

|

May 29, 2022 | 3:15 PM

अहमदाबाद : आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधला फायनल सामना  29 मे रोजी म्हणजेच रविवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. उद्या आयपीएल फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये फायनलकडे क्रिकेटप्रेमांचं लक्ष लागून आहे. राजस्थानचा संघ 2008 नंतर कधीही फायलनमध्ये पोहोचलेला नाही. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवलं होतं. पण त्यानंतर हा संघ प्लेऑफमध्येही सहजासहजी पोहोचू शकला नाही. 2018 नंतर राजस्थानच्या टीमने पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे.

Key Events

गुजरातनं पहिल्याच विजयात केली कमाल

गुजरात टायटन्सचा हा पहिलीच आयपीएल आहे. हार्दिक पांड्याचा नेतृत्वाखालील या संघाने फायनलमध्ये जागा मिळवली आहे.

14 वर्षांनंतर राजस्थान रॉयल्स फायनलमध्ये

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवलं होतं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 28 May 2022 07:47 PM (IST)

  फायनलआधी हार्दिक पंड्याचा खास इंटरव्यू

  फायनल सुरु व्हायला आता 24 तासांचा अवधी उरला आहे. पहिल्यांदा कॅप्टनशिप भुषवणाऱ्या हार्दिक पंड्यासाठी हे आयपीएल खास आहे. या स्पर्धेआधी फिटनेसवरुन हार्दिक पंड्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता हार्दिकने एक खास इंटरव्यू दिला आहे.

 • 28 May 2022 06:40 PM (IST)

  GT vs RR Prediction Playing XI IPL 2022 Final

  फायनलच्या लढाईत हे खेळाडू मैदानावर उतरणार, जाणून घ्या दोन्ही टीमची प्लेइंग इलेवन

  IPL 2022 Gujarat Titans

 • 28 May 2022 06:09 PM (IST)

  गुजरात टायटन्सने आपल्या प्रवासावर टाकली नजर

  लीगमध्ये प्रथमच खेळत असलेल्या गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी आपला सुरुवातीपासूनचा प्रवास आठवला.

 • 28 May 2022 06:07 PM (IST)

  संजू सॅमसनने घेतला जोस बटलरचा इंटरव्यू

 • 28 May 2022 06:04 PM (IST)

  कसा असेल क्लोजिंगचा भव्य सोहळा

  IPL 2022 Closing Ceremony: एआर रेहमान, रणवीर सिंह, भरणार रंग, जाणून घ्या कसा असेल क्लोजिंगचा भव्य सोहळा.

  Rehman-Ranveer

 • 28 May 2022 05:20 PM (IST)

  बुक करा IPL 2022 फायनलचं तिकीट

  GT vs RR: ‘या’ स्टेप्स फॉलो करुन बुक करा IPL 2022 फायनलचं तिकीट

  GT vs RR (2)

  गुजरात विरुद्ध राजस्थान सामना

 • 28 May 2022 05:03 PM (IST)

  मनसे नेते बाळा नांदगावकर Live

  सर्व नेत्यांचा राज्यभर दौरा होणार

  त्यानंतर आमचा नोंदणी सप्ताह सुरू होणार

  आमचा प्रत्येक कार्यकर्ता घराघरात पोहोचणार

  लेटमधील मजकूर आत्ताच सांगत नाही

  आम्ही निवडणुकीला जोमाने सामोरे जाणार आहोत

  पालिका निवडणुकीची जबाबदारी लवकरच देण्यात येणार

  राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकांचा रोडमॅप दिला

 • 28 May 2022 05:00 PM (IST)

  अमरावतीत राणा दाम्पत्याच्या गंगा सावित्री निवस्थाना समोर स्वागताची जय्यत तयारी सुरू

  राणा कुटूंबीय करणार खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचं स्वागत....

  राणा दाम्पत्याचा दुग्धभिषेक देखील केला जाणार.....सुंदर कांड देखील होईल...सात पंडित पूजन करतील...

  दीड क्विंटल फुलांचा हार टाकला जाईल.....

  घरासमोर व्यासपीठाची उभारणी सुरू...

  राणा दाम्पत्य कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता..

  विरोधकांचाही  समाचार घेण्याची शक्यता..

 • 28 May 2022 04:38 PM (IST)

  रत्नागिरी- धोपेश्वर रिफायनरी विरोधात आज महिलांचा एल्गार

  सोलगावच्या  गांगेश्वर मंदिराच्या मैदानात रिफायनरी विरोधात महिला एकवटल्या

  महिलांच्या हातात रिफायनरी विरोधातले बॅनर

  धोपेश्वर सोलगाव बारसू इथल्या महिला रिफायनरी विरोधातल्या मेळाव्याला

  थोड्याच वेळात रिफायनरी विरोधातील महिला मेळाव्याला होणार सुरुवात

  तर उद्या भाजपचा रिफायनरीचा स्वागत मेळावा

 • 28 May 2022 04:35 PM (IST)

  अमरावती - तिवसामध्ये राणा दाम्पत्यचे चौकात होणार स्वागत

  स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर

 • 28 May 2022 04:17 PM (IST)

  आता ‘चॅम्पियनशिप’साठी फायनल लढाई

  GT vs RR IPL 2022 Final Match Preview आता ‘चॅम्पियनशिप’साठी फायनल लढाई, जो सर्वोत्तम तोच विजेता, इथे क्लिक करुन जाणून घ्या....

 • 28 May 2022 02:57 PM (IST)

  संजू सॅमसन काय करत होता?

  संजू सॅमसन

  IPL 2022 Final: Rajasthan Royals ने शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये IPL ट्रॉफी जिंकली, त्यावेळी संजू सॅमसन काय करत होता?

 • 28 May 2022 02:51 PM (IST)

  अश्विनची बायको प्रीति आणि रासीचा डान्स

  बटलरला दुसरा नवरा म्हणणारी रासी आणि अश्विनची बायको राजस्थानच्या विजयानंतर कशा नाचल्या ते इथे क्लिक करुन बघा 

  RR Win over RCB

 • 28 May 2022 02:20 PM (IST)

  क्लोजिंग समारोपात लाँच होणार 'लाल सिंह चड्ढा'चा ट्रेलर

  आयपीएल 2020च्या क्लोजिंग समारोपात बॉलिवूड तारकांचा जंगी कार्यक्रम तर बघायला मिळणारच आहे. याशिवाय पहिल्यांदा या कार्यक्रमात एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला जाणार आहे.

 • 28 May 2022 01:17 PM (IST)

  राणा दाम्पत्याचं नागपूरात स्वागत केलं जात आहे,

  राणा दाम्पत्याचं नागपूरात स्वागत केलं जात आहे,

  संपुर्ण महाराष्ट्रात श्री रामाचा जयजयकार होत आहे

  जय श्री रामाच्या घोषणा दिल्या जात आहेत

  हनुमानाची गदा देण्यात आली आहे

  महाराष्ट्रात का एवढा विरोध आहे

  दिल्लीत आम्हाला कसलाही त्रास दिला नाही

  दिल्लीत आम्ही आरती केली

  तिथं हनुमान चाळीसा सुद्धा वाचली आहे

  आज शनिवार आहे, त्यामुळे आम्ही हनुमान चाळीसाचे वाचन करणार आहे.

 • 28 May 2022 12:44 PM (IST)

  आयपीएल फायनलपूर्वी क्लोजिंग समारोप

  29 मे रोजी रविवारी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. गुजरात आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ या सामन्यात विजयासाठी भिडणार आहे. मात्र, सामनापूर्वी क्लोजिंग समारोप होईल. ज्याची सुरुवात संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी होईल.

 • 28 May 2022 11:43 AM (IST)

  राजस्थानच्या कामगिरीकडेही असणार विशेष लक्ष

 • 28 May 2022 11:38 AM (IST)

  गुजरात टायटन्सच्या प्लेइंग इलेवनची उत्सुकता

 • 28 May 2022 11:36 AM (IST)

  आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा कुणी काढल्या?

  1. 973 धावा: विराट कोहली (2016)
  2. 848 धावा: डेव्हिड वॉर्नर (2016)
  3. 824 धावा: जोस बटलर (2022)
  4. 735 धावा: केन विल्यमसन (2018)
  5. 733 धावा: ख्रिस गेल (2012)
  6. 733 धावा: माइक हसी (2013)
 • 28 May 2022 11:34 AM (IST)

  T20 लीगमधील सर्वाधिक शतके

  T20 लीगमधील सर्वाधिक शतके करणारे खेळाडू जाणून घ्या...

  1. विराट कोहली: 04 (IPL 2016)
  2. जोस बटलर: 04 (आयपीएल 2022)
  3. मायकेल क्लिंगर (T20 ब्लास्ट 2015)
 • 28 May 2022 11:30 AM (IST)

  राजस्थान रॉयल्सचं हॉटेलमध्ये जोरदार स्वागत

  राजस्थान रॉयल्स फायनलमध्ये गेल्यानं संपूर्ण संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. संपूर्ण टीम जेव्हा हॉटेलमध्ये पोहचली तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे संघाचं स्वागत राजस्थानी संगीत लावून करण्यात आलं.

 • 28 May 2022 11:19 AM (IST)

  हनुमान चालीसा वाचून मी घरातून बाहेर निघतो, आमची आस्था आहे - नाना पटोले

  - हनुमान चालीसा वाचून मी निघतोय. आमची आस्था आहे

  - पण मुळ प्रश्न वेगळे आहेत. मोदी सरकारने देश विकून चालवण्याचं काम चालवलंय

  - देशात गरीबी, महागाई हे मोठे प्रश्न आहे

  - राणा दाम्पत्यावर काहीही बोलणार नाही

  - हनुमान चालीसा हा आस्थेचा विषय आहे. त्याची जाहिरात आम्ही केली नाही

  - महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रियांका गांधी यांना तिकीट मिळाली तर सर्व काँग्रेस स्वागत करणार

  - भाजप चव्वणीछाप रोज ४० लाख रुपये खर्चून सोशल मिडिया चालवतात. भाजपच्या भाडोत्री लोकांना तोंड देता यावं म्हणून आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांना सोशल मिडियाचं ट्रेनिंग देतोय.

  - आर्यन खान विषयावर आम्ही आमची भुमिका मांडली होती. वानखेडेवर काहीही कारवाई होणार नाही. कारण वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणांचा पोपट आहे

 • 28 May 2022 09:31 AM (IST)

  गुजरात टायटन्सची सपोर्टर आहे ही महिला क्रिकेटर

  भारतीय महिला क्रिकेट संघाची विकेटकीपर फलंदाज यस्तिका भाटिया आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सची सपोर्टर आहे. तिनं ट्विट करून गुजरात टायटन्स आणि हार्दिक पांड्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

 • 28 May 2022 09:22 AM (IST)

  गुजरातनं आतापर्यंत कोणत्या संघाला पराभूत केलं?

  गुजरात टायटन्सने आतापर्यंत कोणत्या संघाला किती गडी राखून पराभूत केलं? ते जाणून घ्या...

  1. वि. लखनौ सुपर जायंट्स - 5 गडी राखून विजयी
  2. वि. दिल्ली कॅपिटल्स - 14 धावांनी विजयी
  3. पंजाब किंग्ज विरुद्ध - 6 गडी राखून विजयी
  4. विरुद्ध राजस्थान रॉयल्स - 37 धावांनी विजयी
  5. वि. चेन्नई सुपर किंग्ज - 3 गडी राखून विजयी
  6. वि कोलकाता नाईट रायडर्स - 8 धावांनी विजयी
  7. विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - 5 गडी राखून विजयी
  8. विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 6 गडी राखून विजयी
  9. विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - 62 धावांनी विजयी
  10. वि चेन्नई सुपर किंग्ज - 7 गडी राखून विजयी
  11. वि. राजस्थान रॉयल्स - 7 गडी राखून विजयी (क्वालिफायर 1)
 • 28 May 2022 09:19 AM (IST)

  राजस्थाननं कोणत्या संघाला किती फरकानं पराभूत केलंय?

  राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत कोणत्या संघाला किती फरकाने पराभूत केलंय? हे जाणून घ्या

  1. वि . सनरायझर्स हैदराबाद - 61 धावांनी विजयी
  2. वि. मुंबई इंडियन्स - 23 धावांनी विजयी
  3. वि. - लखनौ सुपर जायंट्स - 3 धावांनी विजयी
  4. वि. - कोलकाता नाईट रायडर्स - 7 धावांनी विजयी
  5. वि. - दिल्ली कॅपिटल्स - 15 धावांनी विजयी
  6. वि - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 29 धावांनी विजयी
  7. वि. - पंजाब किंग्ज - 6 गडी राखून विजयी
  8. वि. - लखनौ सुपर जायंट्स - 24 धावांनी विजयी
  9. वि. - चेन्नई सुपर किंग्ज - 5 गडी राखून विजयी
  10. विरुद्ध – वि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – 7 गडी राखून विजयी – (क्वालिफायर 2)
 • 28 May 2022 09:16 AM (IST)

  आयपीएलमध्ये तिकिटांचा काळाबाजार?

  यंदाच्या पंधराव्या टाटा आयपीएलची अंतिम लढत प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन पाहण्याला क्रिकेटशौकीन पसंती देताना दिसत आहे. आयपीएल अंतिम लढतीचे सर्वात स्वस्त तिकीट 800 रुपये तर सर्वात महागडे तिकीट 65 हजार रुपये किंमतीचे आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 32 हजार इतकी मोठी आहे. यंदाची आयपीएलची लढत रविवारी असल्याने हे स्टेडियम खचाखच भरण्याची दाट शक्यता आहे. आयपीएल आवडणाऱ्यांनी तिकिटावर उड्या घेत आधीच सर्व तिकीटे विकत घेतली आहे. त्यामुळे यंदा अहमदाबादमध्ये रविवारी आयपीएल फायनलच्या तिकिटांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

 • 28 May 2022 09:15 AM (IST)

  29 मे कुणाचा होणार, क्रिकेटप्रेमींना उत्सुकता

  29 मे रोजी म्हणजे रविवारची रात्र चांगलीच रोमांचक असणार आहे. गुजरात आणि राजस्थान या दोन्ही संघापैकी कोण जिंकणार याकडे विशेष लक्ष्य असणार आहे.

Published On - May 28,2022 9:11 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें