GT vs RCB Live Streaming : गुजरात-बंगळुरु आमनेसामने, शुबमनसेना विराटच्या टीमला पराभूत करणार?
Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru IPL 2026 Live Scorecard : गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांची आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. जाणून घ्या दोन्ही संघांतील हेड टु हेड रेकॉर्ड्स.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. गुजरात विरुद्ध बंगळुरु यांच्यातील हा सामना 30 एप्रिलला होणार आहे. गुजरात आणि बंगळुरु दोन्ही संघांची या मोसमात एकमेकांविरुद्ध आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघात 6 दिवसांआधी सामना झाला होता. बंगळुरु विरुद्ध गुजरात यांच्यात 24 एप्रिलला सामना झाला होता. त्या सामन्यात आरसीबीने गुजरातवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता गुजरातकडे घरच्या मैदानात सामना जिंकून गेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. उभयसंघातील 30 एप्रिल रोजीचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे गुजरात सामना जिंकून आरसीबीचा हिशोब करणार की गतविजेता संघ शुबमनेसेनेला दुसऱ्यांदा पराभूत करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सामन्यात रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.
गुजरात आणि बंगळुरु या दोन्ही संघांचा हा नववा सामना असणार आहे. गुजरातने आतापर्यंत 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. गुजरात 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर आरसीबीने 8 पैकी 6 सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं आहे. आरसीबी 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना कधी?
गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना गुरुवारी 30 एप्रिलला होणार आहे.
गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना कुठे?
गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
गुजरात विरुद्ध बंगळुरु सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
गुजरात विरुद्ध बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.
दोघांपैकी वरचढ कोण?
गुजरात विरुद्ध बंगळुरु यांच्यात आतापर्यंत एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. आरसीबीने या 7 पैकी सर्वाधिक 4 सामने जिंकले आहेत. तर गुजरातने आरसीबी विरुद्ध 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता उभयसंघात होणाऱ्या आठव्या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.