AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : घड्याळांची किंमत 5 नव्हे 1.5 कोटी रुपये; हार्दिक पंड्याचं स्पष्टीकरण

खराब फॉर्मचं संकट समोर असतानाच आता एक नवं संकट हार्दिक पंड्यासमोर उभं ठाकलं आहे. हार्दिक पंड्याकडून 2 महागडी घड्याळं कस्टम विभागानं एयरपोर्टवर जप्त केल्याची बातमी काल (15 नोव्हेंबर) समोर आली होती.

Hardik Pandya : घड्याळांची किंमत 5 नव्हे 1.5 कोटी रुपये; हार्दिक पंड्याचं स्पष्टीकरण
Hardik pandya
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 12:48 PM
Share

मुंबई : आयपीएल आणि टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये खराब प्रदर्शन केल्यामुळे हार्दिक पंड्याला आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघात स्थान देण्यात आलेलं नाही. खराब फॉर्मचं संकट समोर असतानाच आता एक नवं संकट पंड्यासमोर उभं ठाकलं आहे. हार्दिक पंड्याकडून 2 महागडी घड्याळं कस्टम विभागानं एयरपोर्टवर जप्त केल्याची बातमी काल (15 नोव्हेंबर) समोर आली होती. दरम्यान, आज सकाळी हार्दिक पंड्याने या प्रकरणावर स्वतःची बाजू मांडली आहे. (Hardik pandya clarifies about 5 crore rupees watch controversy Custom seize and Tax evasion)

हार्दिक पंड्याने मुंबई विमानतळावरील घड्याळ जप्त केल्याच्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. मंगळवारी सकाळी हार्दिक पंड्याने ट्विट केले की, जेव्हा तो दुबईहून परत येत होता, तेव्हा त्याने स्वत: जाऊन आपले घड्याळ कस्टम अधिकाऱ्यांना दिले होते. हार्दिकने इतर सर्व आरोप फेटाळून लावले असून आवश्यक कागदपत्रे सीमाशुल्क अधिकार्‍यांना दिल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी, सोशल मीडियावर दावा केल्यानुसार घड्याळाची किंमत 5 कोटी रुपये नसून 1.5 कोटी रुपये असल्याचे त्याने स्पष्ट केले.

हार्दिक पंड्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 15 नोव्हेंबरला सकाळी दुबईहून परतत असताना माझी बॅग घेऊन मी स्वतः मुंबई विमानतळाच्या कस्टम काउंटरवर गेलो आणि तिथून आणलेल्या सर्व वस्तूंची कस्टम ड्युटी भरली. सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, या सर्व गोष्टींबाबत मला खरं काय ते सांगायचे आहे.

हार्दिकने लिहिले आहे की, ‘मी दुबईतून येताना काही वस्तू खरेदी केल्या होत्या. मुंबईत आल्यावर या वस्तूंबाबत मी स्वतः कस्टम अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि सीमाशुल्क भरण्यास तयार झालो. सीमाशुल्क विभागाने सर्व आवश्यक कागदपत्रे मागवली आहेत, जी आम्ही देत ​​आहोत. सीमाशुल्क विभाग सध्या शुल्क मोजत आहे, जे मी भरण्यास तयार आहे. तसेच घड्याळाची किंमत 5 कोटी नाही तर 1.5 कोटी आहे.

मी कायद्याचे पालन करणारा नागरिक

हार्दिक पंड्याने आपल्या स्पष्टीकरणात पुढे म्हटले आहे की, मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे, मी सर्व सरकारी यंत्रणांचा आदर करतो. जे काही कागद हवे असतील ते मी सीमाशुल्क विभागाला देण्यास तयार आहे, माझ्यावर जे काही आरोप केले जात आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत.

हार्दिक पंड्या संघासोबत भारतात परतला यावेळी त्याच्यावर एयरपोर्टवर कस्टम विभागाने कारवाई केल्याची बातमी आली होती. त्यावर आज त्याने स्पष्टीकरण दिलं.

हार्दिकला महागड्या घड्याळांचा शौक

हार्दिक पंड्याला आधीपासूनच महागड्या घड्याळांचा शौक आहे. आयपीएल 2021 दरम्यानही त्याने Phillippe Nautilus Platinum 5711 हे घड्याळ घातलं होतं. ज्याची किंमत 5 कोटीच्या घरात होती. 2019 साली हार्दिक पंड्या रुग्णालयात अॅडमिट असतानाही त्याने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने सोन्याचं घड्याळ घातल्याचं दिसून येत होतं.

कृणाल पंड्यावर कारवाई

मागील वर्षीच हार्दिकचा भाऊ क्रुणाल याच्यावरही अशी कारवाई झाली होती. त्यानेही त्याच्या महागड्या वस्तूंबाबत कस्टम विभागाला माहिती न दिल्याने त्या जप्त करण्यात आल्या होत्या.

इतर बातम्या

विश्वचषक स्पर्धा संपली, आता रंगणार भारत-न्यूझीलंड सामने, संपूुर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

बांग्लंदेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 4 खेळाडूंना बाहेरचा रस्ता

हार्दीक पंड्याच्या अडचणी वाढल्या, संघातून बाहेर झाल्यानंतर आता 5 कोटींची 2 घड्याळंही जप्त

(Hardik pandya clarifies about 5 crore rupees watch controversy Custom seize and Tax evasion)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.