AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026: शिस्तबद्ध राहा…! हार्दिक पांड्या आरसीबीच्या खेळाडूला असं का म्हणाला?

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरू आहे. सलग पाच सामने जिंकून बादर फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. आता एक सामना जिंकला की अंतिम फेरीत स्थान मिळेल. असं असताना आरसीबीची गौतमी नाईक चर्चेत आहे. काय झालं ते जाणून घ्या.

WPL 2026: शिस्तबद्ध राहा...! हार्दिक पांड्या आरसीबीच्या खेळाडूला असं का म्हणाला?
WPL 2026: शिस्तबद्ध राहा...! हार्दिक पांड्याने आरसीबीच्या खेळाडूला असं का म्हणाला?Image Credit source: PTI
| Updated on: Jan 20, 2026 | 5:02 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानंतर अंतिम फेरी आणि एलिमिनेटर संघाचं गणित बदलत आहे. पण आरसीबीचा संघ आता निर्धास्त आहे. कारण सलग पाच सामन्यात विजय मिळवून बाद फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. आता एका सामन्यात विजय मिळवला की थेट अंतिम फेरीत खेळणार आहे. आरसीबीच्या पाचव्या विजयात गौतमी नाईकचा मोलचा वाटा राहीला. गुजरात जायंट्सविरुद्ध आरसीबीने 61 धावांनी विजय मिळवला. कारण विजयी धावांचं आव्हान देताना गौतमी नाईकने जबरदस्त खेळी केली. तिने 55 चेंडूत 73 धावांची खेळी केली. आरसीबी अडचणीत असताना तिने आक्रमक खेळी करत संघाला सावरलं. तिच्या खेळीमुळे आरसीबीने 6 गडी गमवून 178 धावा केल्या आणि विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गुजरात जायंट्सला काही गाठता आलं नाही. गुजरातने 20 षटकात 8 गडी गमवून 117 धावा केल्या. या विजयाची शिल्पकार गौतमी नाईक ठरली. तिने सामन्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच हार्दिक पांड्या आदर्श असल्याचं सांगितलं.

आरसीबीची फलंदाज गौतमी नाईकने सांगितलं की, दबावात असताना हार्दिक पांड्यासारखं निर्धास्त चांगली कामगिरी करायची आहे. वुमन्स प्रीमियर लीगने त्यांच्या सोशल मिडिया खात्यावर गौतमी नाईकचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ती म्हणाली की, ‘हार्दिक पांड्या माझे आदर्श आहेत. मी त्यांची कॉपी करते. मला त्याच्यासारखं खेळायचं आहे. त्याचा खेळ, दबावात शांतपणे खेळण्याची पद्धत.. हे सर्व माझ्या स्वभावासारखंच आहे. मला त्याच्यासारखंच खेळायचं आहे.’ तिच्या विधानानंतर हार्दिक पांड्याने तिला खास मेसेज पाठवला आहे.

हार्दिक पांड्या म्हणाला, ‘नमस्कार गौतमी.. तू मला आदर्श मानते हे मी ऐकलं. मला खूप छान वाटलं की मी खेळाडूंना प्रेरणा देऊ शकलो. तुझ्या पहिल्या अर्धशतकासाठी अभिनंदन.. खेळाचा आनंद घे. मला आशा आहे तू भविष्यात तुझ्या फ्रेंचायझीला आणि देशाला आणखी गौरव मिळवून देशील. खेळावर प्रेम करत राहा आणि शिस्तबद्ध राहा. आनंद घे.’

गौतमी नाईक 27 वर्षांची असून तिने 2013 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. महाविद्यालयात पुरूष संघात एका खेळाडूची कमतरता असताना तिला खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर प्रशिक्षक अविनाश शिंदे यांनी तिचं करिअर घडवण्यास मदत केली.

धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.