AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हारिस रऊफवर 2 सामन्यांची बंदी, सूर्यकुमार-बुमराहला शिक्षा; आयसीसीच्या बडग्यातून अर्शदीप असा वाचला

आशिया कप स्पर्धेत घृणास्पद कृत्य करणाऱ्या हारिस रऊफविरुद्ध आयसीसीने कारवाईचा बडगा उचलला आहे. इतकंच काय तर सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनाही शिक्षा सुनावली आहे. या कारवाईच्या बडग्यातून अर्शदीप सिंग वाचला आहे.

हारिस रऊफवर 2 सामन्यांची बंदी, सूर्यकुमार-बुमराहला शिक्षा; आयसीसीच्या बडग्यातून अर्शदीप असा वाचला
हारिस रऊफवर 2 सामन्यांची बंदी, सूर्यकुमार-बुमराहला शिक्षा; आयसीसीच्या बडग्यातून अर्शदीप असा वाचला Image Credit source: PTI
| Updated on: Nov 04, 2025 | 9:23 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेत भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले संघ तीन वेळा भिडले. या हायव्होल्टेज सामन्यात आक्रमकता पाहायला मिळाली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफने या स्पर्धेत सर्वात खालची पातळी गाठली. पहिल्यांदा साखळी फेरीतील सामन्यात आणि त्यानंतर अंतिम फेरीत त्याने घृणास्पद कृत्य केलं होतं. साखळी फेरीत केलेल्या कृत्यानंतर त्याला 2 डिमेरिट पॉइंट दिले होते. पण या नंतरही हारिस रऊफचा माज काही कमी झाला नाही. अंतिम फेरीतही भारतीय खेळाडूंना डिवचण्यासाठी त्याने तसंच कृत्य केलं. यासाठी त्याला आणखी 2 डिमेरिट पॉइंट दिले गेले. यामुळे हारिस रऊफ दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळू शकला नव्हता. पण आता दुसऱ्या वनडे सामन्यातही खेळू शकणार नाही. कारण आयसीसीने त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. त्याच्या सामना फीच्या 60 टक्के दंडही ठोठावला आहे.

दुसरीकडे सूर्यकुमार यादववर मॅच फीच्या 30 टक्के दंड आणि दोन डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले आहेत. साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवने हा विजय पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्यांना आणि भारतीय सैन्याच्या विजयाला समर्पित केला होता. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिरच्या झोंबल्या होत्या. त्यांनी याची तक्रार आयसीसीकडे केली होती. इतकंच काय तर सूर्यकुमार यादवने या संदर्भात माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे आयसीसीने त्याच्या सामना फीच्या 30 टक्के दंड ठोठावला आहे आणि दोन डिमेरिट पॉइंट दिले आहेत.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हारिस रऊफची विकेट घेतल्यानंतर फायटर जेट पाडल्याचा इशारा केला होता. त्यामुळे त्यालाही एक डिमेरिट पॉइंट दिला आहे. तर अर्धशतकी खेळी केल्यानंतर एके 47 सेलीब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानला एक डिमेरिट पॉइंट दिला आहे. दरम्यान, सामन्यानंतर अर्शदीप सिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण यात अर्शदीप सिंग काही दोषी आढळला नाही. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत
महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत.
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र.
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर.
ज्यांचे पती, वडील नाही अशा 'बहिणीं'साठी मोठे बदल, तटकरेंची मोठी माहिती
ज्यांचे पती, वडील नाही अशा 'बहिणीं'साठी मोठे बदल, तटकरेंची मोठी माहिती.
अंजली दमानियांचा अजित दादांच्या 69 कंपन्यांबाबत गंभीर आरोप काय?
अंजली दमानियांचा अजित दादांच्या 69 कंपन्यांबाबत गंभीर आरोप काय?.
मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल
मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल.
सांगली हादरली, बर्थडे पार्टीत काय घडलं? नेत्याची 'मुळशी पॅटर्न'न हत्या
सांगली हादरली, बर्थडे पार्टीत काय घडलं? नेत्याची 'मुळशी पॅटर्न'न हत्या.
दिल्ली स्फोट... जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला! कनेक्शन नेमकं काय?
दिल्ली स्फोट... जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला! कनेक्शन नेमकं काय?.
बिबट्या दिसला की थेट गोळ्या घाला, वनमंत्र्यांचे फर्मान नेमंक काय?
बिबट्या दिसला की थेट गोळ्या घाला, वनमंत्र्यांचे फर्मान नेमंक काय?.
एकमेकांविरोधात लढा पण... महायुतीच्या बैठकीत ठरलेली खास रणनिती काय?
एकमेकांविरोधात लढा पण... महायुतीच्या बैठकीत ठरलेली खास रणनिती काय?.