AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : थांब, तु जाऊ नकोस, गंभीरच्या लाडक्याला इंग्लंड दौऱ्यात संधी!

England vs India Test Series 2025 : बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरक यांनी 24 मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. आता त्यात आणखी एका खेळाडूला जोडलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

IND vs ENG : थांब, तु जाऊ नकोस, गंभीरच्या लाडक्याला इंग्लंड दौऱ्यात संधी!
Team India Suryakumar SanjuImage Credit source: PTI
| Updated on: Jun 17, 2025 | 1:46 PM
Share

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. उभयसंघातील सलामीचा सामना हा 20 जूनपासून हेडिंग्ले लीड्स येथे खेळवण्यात येणार आहे. शुबमन गिल याचा कर्णधार म्हणून हा पहिलाच दौरा आहे. त्यात आर अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी त्रिकुटाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा आव्हानात्मक ठरणार आहे. कसोटी मालिकेच्या दृष्टीने सराव व्हावा यासाठी सिनिअर टीम इंडिया विरुद्ध इंडिया ए असा एक सामना (इन्ट्रा स्क्वॉड) खेळवण्यात आला. त्याआधी इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 4 दिवसीय 2 सामने खेळवण्यात आले. इंडिया एच्या खेळाडूंनी या दोन्ही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आणि मालिका 0-0 ने बरोबरीत राखण्यात यश मिळवलं.

इंडिया ए च्या इंग्लंड दौऱ्यानंतर आता खेळाडू मायदेशी परतणार आहे. मात्र इंडिया ए टीममधील एका खेळाडूला थांबवण्यात आलं आहे. या खेळाडूने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदार्पण केलं होतं. तसेच हा खेळाडू हेड कोच गौतम गंभीर याच्या मर्जीतला आहे. त्यामुळे या खेळाडूला इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा युवा आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला इंग्लंडमध्येच थांबायला सांगितलं आहे. इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेला आता काही दिवस बाकी असताना हर्षितचा समावेश केला जाऊ शकतं, अशी चर्चा पाहायला मिळत आहे. आता हर्षितचा मुख्य संघात समावेश केला जातो की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इंग्लंड लायन्स विरुद्धची कामगिरी

हर्षित इंग्लंड लायन्स विरूद्धच्या पहिल्या अनऑफिशियल टेस्ट मॅचमध्ये खेळला होता. हर्षितला त्या सामन्यात काही विशेष करता आलं नव्हतं. हर्षितला 99 धावांच्या मोबदल्यात फक्त 1 विकेट घेण्यात यश आलं होतं. मात्र त्यानंतरही हर्षितला थांबायला सांगिलं आहे. तर इंडिया ए टीममधील इतर खेळाडू 17 जून रोजी मायदेशी परतणार आहेत.

हर्षिचती क्रिकेट कारकीर्द

हर्षितच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला काही महिन्यांपूर्वी सुरुवात झालीय. हर्षितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कसोटी पदार्पण केलं. हर्षितने पदार्पणातील सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. तसेच वेग, स्विंग आणि आक्रमक बॉलिंगच्या जोरावर नितीशने क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच हर्षितने आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी 13 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या.

हर्षितने आतापर्यंत टीम इंडियाचं तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. हर्षितने 2 कसोटी, 5 वनडे आणि 1 टी 20I मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हर्षितला 6 महिन्यांमध्ये तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.