AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya: “मी लवकरच…”, हार्दिक पंड्याची रोखठोक भूमिका, थेटच बोलला…

Hardik Pandya-Natasa Stankovic: हार्दिक पंड्याच्या वैयक्तिक आयुष्याची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा पाहायला मिळत आहे. नताशा स्टेनकोविकसह घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु असताना हार्दिकने बेधडक प्रतिक्रिया दिली आहे.

Hardik Pandya: मी लवकरच..., हार्दिक पंड्याची रोखठोक भूमिका, थेटच बोलला...
Natasa Stankovic and Hardik PandyaImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 02, 2024 | 11:36 PM
Share

टीम इंडियाचा उपकर्णधार आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या गेल्या काही दिवसांपासून वैवाहिक जीवनामुळे चांगलाच चर्चेत आहे. हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशा स्टेन्कोविक या दोघांमध्ये बिनसल्याचं असून लवकरच घटस्फोट होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अद्याप नताशा आणि हार्दिक या दोघांनी या अफवा-चर्चांबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. अशात हार्दिक पंड्या आता टीम इंडियासह अमेरिकेत टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत आहेत. हार्दिकने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यात बांगलादेश विरुद्ध 23 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 40 धावांची नाबाद खेळी केली. हार्दिक पंड्याने या सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली. हार्दिकच्या प्रतिक्रियेचं संबंध नेटकरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यासह जोडत आहेत.

हार्दिक पंड्या काय म्हणाला?

“मी कधीही यापासून दूर जाणार नाही. लढा कायम ठेवणार. मला वाटतं की तुम्ही खेळ किंवा मैदान अर्थात लढा देणं सोडता, तर तुम्हाला तुमच्या खेळातून ते मिळणार नाही जे तुम्हाला अपेक्षित आहे किंवा तो परिणाम मिळणार नाही, ज्याच्या तुम्ही शोधात आहात. मला असं वाटतं की तुम्ही अखेरपर्यंत लढ्यात कायम रहावंच लागेल”, असं हार्दिक पंड्याने स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना म्हटलं.

“हो हे माझ्यासाठी अवघड राहिलं आहे.मात्र मी यापासून प्रेरित आहे. मी माझ्या दिनक्रम कायम राखण्याचा प्रयत्न केलाय, ज्यानुसार मी आधी सर्व काही करायचो. हे असं सर्व होत राहतं.चांगली-वाईट वेळ येत जात असते. मी अशा परिस्थितीतून गेलो आहे. मी लवकरच यातून बाहेर पडेन”, असंही पंड्याने म्हटलं.

हार्दिकचा रोख नताशाकडे?

“मी यशाबाबत फार गांभीर्याने विचार करत नाहीत. मी जे काही करतो चांगलं करतो, मी झालंय ते विसरुन पुढे निघालो आहे. वाईट वेळेबाबतही असंच आहे. मी वाईट वेळेपासून दूर पळत नाही. मी प्रत्येक परिस्थितीचा सामना करतो. ही पण वेळ निघून जाईल. त्यामुळे अशा परिस्थितीतून बाहेर येणं सरळ आहे. फक्त ते आपल्याला स्वीकार करायलं हवं. कठोर मेहनत कधीच वाया जात नाही”, असंही पंड्याने सांगितलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.