AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, इंग्लंडची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

Australia vs England Toss : ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेतील पहिल्याच सामन्यात चेज करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

Icc Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, इंग्लंडची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
aus vs eng toss ct 2025
| Updated on: Feb 22, 2025 | 2:39 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बी ग्रुपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना आहे. सामन्याचं आयोजन लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस झाला. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने फिल्डिंगचा निर्णय घेत इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता टॉसनंतर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ स्पर्धेत विजयी सुरुवात करण्याच्या इच्छेने मैदानात उतरणार आहेत. या प्रयत्नात कुणाला यश येतं? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

इंग्लंडने सामन्याच्या काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली. त्यानुसार कॅप्टन जोस बटलर आणि फिल सॉल्ट हे दोघे असूनही जेमी स्मिथ विकेटकीपिंग करणार असल्याचं जाहीर केलं. तसेच जेमी स्मिथ तिसऱ्या स्थानी बॅटिंग करणार आहे. इंग्लंडचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची कसा सामना करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत आपल्या मुख्य खेळाडूंशिवाय मैदानात उतरली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा चांगलाच कस लागणार आहे.

नियमित कर्णधार पॅट कमिन्स, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि ऑलराउंडर मिचेल मार्श या तिघांना दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. मार्कस स्टोयनिस याने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड होऊनही एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तर मिचेल स्टार्क याने वैयक्तिक कारणाने खेळणार नसल्याचं सांगितलं. अशात कांगारु या 5 खेळाडूंशिवाय या स्पर्धेत कशी कामगिरी करते? हे पाहण्यासारखं असणार आहे.

दोघांपैकी वरचढ कोण?

दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड दोन्ही संघ चॅम्पिन्स ट्रॉफीत आमनेसामने येण्याची ही सहावी वेळ आहे. याआधी झालेल्या 5 पैकी 3 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. तर 2 वेळा ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर मात केली आहे. तसेच आयसीसी स्पर्धेतील उभयसंघांचा हा 16 वा एकदिवसीय सामना आहे. त्याआधी इंग्लंडने 6 आणि ऑस्ट्रेलियाने 9 सामने जिंकले आहेत.

ऑस्ट्रेलिया टॉसचा बॉस

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), एलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झॅम्पा आणि स्पेन्सर जॉन्सन.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन), फिलिप साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.

Follow Us
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...
संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास, ठाकरे, राष्ट्रवादीच्या बैठक
संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास, ठाकरे, राष्ट्रवादीच्या बैठक.