AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडने 98 धावांनी मिळवला विजय, प्लिमरची शतकी खेळी ठरली निर्णायक

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु असताना दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने विजयी पताका रोवली आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी न्यूझीलंड क्रिकेटप्रेमींना आनंदाची बातमी मिळाली आहे. मालिका 2-0 ने खिशात घातली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडने 98 धावांनी मिळवला विजय, प्लिमरची शतकी खेळी ठरली निर्णायक
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Mar 09, 2025 | 5:16 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असताना दुसरीकडे न्यूझीलंड आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघात वनडे मालिका सुरु होती.  आयसीसी चॅम्पियनशिप वनडे मालिकेतील शेवटच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेला 98 धावांनी पराभूत करत मालिका खिशात घातली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 50 षटकात 6 गडी गमवून 280 धावा केल्या आणि विजयासाठी 281 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही श्रीलंकेला गाठता आलं नाही. श्रीलंकन संघ 50 षटकात सर्व गडी बाद 182 धावा करू शकला. न्यूझीलंडकडून पहिल्या विकेटसाठी सूझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर या जोडीने 108 धावांची भागीदारी केली. सुझी बेट्सने 69 चेंडूत 53 धावा केल्या. तर जॉर्जिया प्लिमरने 120 चेंडूत 112 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे न्यूझीलंडला 280 धावांपर्यंत मजल मारता आली.

न्यूझीलंडने दिलेलं आव्हान गाठताना श्रीलंकेची सुरुवात काही चांगली झाली नाही. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. विश्मी गुणरत्ने 6, चमारी अथापथु 5, हर्षिता समरविक्रमा 8, तर इमिशा दुलानी 11 धावा करून बाद झाले. तर मधल्या फळीत कविशा दिलहारी आणि निलाक्षी डीसिल्वा यांनी प्रत्येकी 45 धावा केल्या. मात्र या व्यतिरिक्त एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकला नाही. न्यूझीलंडकडून जेस केर आणि फ्रॅन जोनास यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर एडेन कार्सनने 2, तर ब्रूक हालिडे आणि मॅडी ग्रीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): चामारी अथापथु (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), इमेषा दुलानी, अचीनी कुलसूरिया, सुगंधिका कुमारी, चेतना विमुक्ती, सचीला.

न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स (कर्णधार), जॉर्जिया प्लिमर, एम्मा मॅकलिओड, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेझ, जेस केर, पॉली इंग्लिस (विकेटकीपर), एडन कार्सन, फ्रॅन जोनास, ब्री इलिंग.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.