T20 World Cup : भारताच्या शेजारी देशात स्पर्धा खेळवण्याची आयसीसीची तयारी, युएईशिवाय ‘या’ देशाला मिळू शकते यजमानपद

यंदा टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे पर्यायी देशांत स्पर्धा खेळवण्याची चर्चा आहे. यात युएईसोबत आणखी एका आशियाई देशाचीही चर्चा आहे.

T20 World Cup : भारताच्या शेजारी देशात स्पर्धा खेळवण्याची आयसीसीची तयारी, युएईशिवाय 'या' देशाला मिळू शकते यजमानपद
आयसीसी
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 5:14 PM

मुंबई : सध्या सर्वांचा आवडता क्रिकेट प्रकार म्हणजे टी-20. त्यात यंदा टी-20 विश्वचषकही (T-20 World Cup) खेळवण्यात येणार आहे. मात्र स्पर्धेच्या ठिकाणाला घेऊन आयसीसी (ICC) चिंतेत आहे. कारण स्पर्धेचं ठिकाण भारत असताना भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याने ठिकाण बदलण्याची चर्चा सुरु आहे. स्पर्धा ऑक्टोबरमध्ये सुरु होऊन नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. तोवर भारतातील कोरोना स्थितीवर आयसीसी योग्य तो निर्णय घेणार असून पर्याय म्हणून इतर देशांबाबतही चर्चा सुरु आहे. ज्यात युएईचे (UAE) नाव सर्वात आधी घेतले जाते. त्यानंतर आता भारताचा शेजारी देश श्रीलंका येथेही स्पर्धेचे आयचोजन घेण्याबाबत आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये चर्चा सुरु आहे. (ICC Deciding to take T20 World Cup in Sri lanka)

भारतात दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजूनही आहेच. त्यातच बीसीसीआय आतापर्यंत वर्ल्डकपसाठी भारत सरकारकडून टॅक्स सूटही अद्याप मिळवू शकलेला नाही. या दोन मुद्द्यांमुळे बीसीसीआय संभ्रमात असल्याने अंतिम निर्णयासाठी बीसीसीआयने एक महिना मागितला आहे.

BCCI कडून प्राथमिक चर्चा

बीसीसीआयचे अधिकारी सध्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबतच्या चर्चेसाठी यूएईमध्ये आहेत. मात्र युएईतच विश्वचषकाआधी आय़पीएलचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मैदानांची स्थिती दोन मोठ्या स्पर्धांचे आयोजन या सर्वाचा ताळमेळ बसवणे कठीण असल्याचे एएनआय वृत्तसंस्थेच्या एका रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

IPL साठीही श्रीलंका इच्छूक

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयपीएल सामने त्यांच्या देशात घेण्याची इच्छा बीसीसीआयकडे व्यक्त केली होती. तसा प्रस्तावही दिला होता. मात्र अखेर आयपीएलचे उर्वरीत सामने युएईत होणार असल्याच निश्चित करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 19 सप्टेंबरपासून यूएईत आयपीएलला सुरुवात होऊ शकते. तर 15 ऑक्टोबरला दसऱ्यादिवशी आय़पीएलचा अंतिम सामना होऊ शकतो. ज्यानंतर टी-20 विश्वचषक खेळवला जाईल.

संबधित बातम्या :

T20 World Cup : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही, BCCI च्या बैठकीत काय ठरलं?

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची तारीख ठरली, पण BCCI पुढे ही सर्वांत मोठी अडचण!

(ICC Deciding to take T20 World Cup in Sri lanka)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.